vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

अंबड मध्ये धान्याच्या काळ्याबाजारीवर मोठी कारवाई: काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 6.37 लाखांचा शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त; एकावर गुन्हा दाखल

अंबड मध्ये धान्याच्या काळ्याबाजारीवर मोठी कारवाई:

काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला 6.37 लाखांचा

शासकीय/शालेय पोषण आहाराचा धान्यसाठा जप्त; एकावर गुन्हा दाखल

जालना, प्रतिनिधी : शासकीय योजने अंतर्गत शालेय पोषण आहारासाठी उपयोगात येणारे गहू व तांदळाचा साठा, काळ्या बाजारात बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने पोलिस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 6 लाख 37 हजार 418 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गोदाम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. 16 जुलै 2026 रोजी सायंकाळी पुरवठा व महसूल विभागाला गोपनीय माहिती मिळाली की, चांगले नगर, अंबड येथील एका खाजगी पत्र्याच्या गोदामात बेकायदेशीररित्या धान्याचा साठा करून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पथकाने पोलीस कर्मचाऱ्यांसह रात्री 7.45 वाजेच्या सुमारास सदर गोदामावर छापा टाकला.

गोदामाच्या दरवाजाला कुलूप असल्याने आणि मालक शेख नसीर अब्बास बागवान (रा. अंबड) यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने, पंचासमक्ष गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

तपासणी दरम्यान गोदामात कोणताही वैध परवाना किंवा नोंद नसलेला खालील मुद्देमाल मिळून आला यामध्ये गहू 189 गोण्या (एकूण 94.50 क्विंटल) – किंमत अंदाजे रु. 2 लाख 97 हजार 702 तर तांदूळ 152 गोण्या (एकूण 76 क्विंटल) – किंमत अंदाजे रु. 3 लाख 33 हजार 716 इतर साहित्य मध्ये शासकीय धान्य वितरणासाठी वापरली जाणारी 80 रिकामी पोती आणि 6 हजार 500रुपये किमतीचा एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण रु. 6 लाख 37 हजार 418 मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास याप्रकरणी तहसील कार्यालय अंबड येथील निरीक्षण अधिकारी किरणकुमार शत्रुघ्न खांडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख नसीर अब्बास बागवान याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम 3 आणि 7 अन्वये गुन्हा (रजि. नं. 0528/2026) दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (SI) भगवान नरोडे करत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आता भारत व युरोप यांच्यात युपीआयसह व्यवहार शक्य? आरबीआयकडून मोठी माहिती समोर

vishwatmaklokswamivarta

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची उपस्थिती

मराठवाड्यात जोरदार पावसाने शेतकरी संकटात

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात बोट उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त पंतप्रधानांनी केली मदतीची घोषणा

vishwatmaklokswamivarta