vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्वामित्व योजनेअंतर्गत आज (दि.१८)सनद वितरण कार्यक्रम; थेट प्रसारण पाहता येणार

स्वामित्व योजनेअंतर्गत आज (दि.१८)सनद वितरण कार्यक्रम; थेट प्रसारण पाहता येणार

 

राज्य प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगर,-स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्तेचे ड्रोन सर्व्हेक्षण करुन मालमत्तेचे कार्ड म्हणजेच सनद वितरण शनिवार दि.१८ रोजी होणार आहे. हा कार्यक्रम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून दूरदृष्यप्रणालीद्वारे या कार्यक्रमाचे थेट प्रसारण पाहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. इतर मागासवर्ग कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख डॉ. विजय वीर, संजय केणेकर, बापू घडामोडे यावेळी उपस्थित होते

 डॉ. कराड यांनी माहिती दिली की, स्वामित्व योजना ही ग्रामिण भागामध्ये सुधारीत तंत्रज्ञानासह, सर्व्हेक्षण आणि मॅपिंग अर्थात मालमत्तेचे सर्व्हेक्षण करणारी केंद्र पुरस्कृत योजना आहे. जमिन मालकाला त्याच्या जमिनीचा कायदेशीर रितसर हक्क मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. जिल्ह्यात ९२५ गावांपैकी ७२७गावांमध्ये ही मोजणी पूर्ण झाली आहे. तर १ लाख १३ हजार प्रॉपर्टी कार्डस चे वितरण करण्यात आले आहे. शनिवारी दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. तसेच प्रत्येक तालुका मुख्यालयातही हा कार्यक्रम पाहण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. मंत्री अतुल सावे यांनीही कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन केले,

 जिल्हा मुख्यालयातील कार्यक्रमास इतर मागास बहुजन कल्याण , दुग्ध विकास मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, खा. डॉ. कल्याण काळे, विधानपरिषद सदस्य आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम काळे, विधानसभा सदस्य आ. अब्दुल सत्तार, आ. प्रशांत बंब, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. विलास भुमरे, आ. श्रीमती अनुराधा चव्हाण, आ. श्रीमती संजना जाधव तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपसंचालक किशोर जाधव भूमिअभिलेख आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. विजय वीर यांनी तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

डोंगरी महोत्सव कालावधीत चोख पोलीस राहणार एसटीच्या जादा बसेस सोडणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यात काल ११२.७. मिमी पावसाची नोंद

राज्यभर १ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा अभियान’ केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयोजन; ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ ही संकल्पना

vishwatmaklokswamivarta

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जातिनिहाय जनगणना हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचा क्रांतिकारक निर्णय ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*