vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयातील कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरूळ रूग्णालयातील कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये पहिल्या रूग्णावर केमोथेरपी उपचार

 

      नवी मुंबई प्रतिनिधी    नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना कॅन्सर संबधित उपचारांकरिता खाजगी रुग्णालयांमध्ये अथवा टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचारार्थ जावे लागते. त्यामुळे अनेकदा रहिवाशांची अडचण होते. ही बाब लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कॅन्सर रूग्णांकरिता अत्यंत महत्वाची अशी केमोथेरपी सुविधा महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्याविषयी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे हे आग्रही होते.

  त्या अनुषंगाने नमुंमपाच्या आरोग्य विभागाने गतीमान पावले उचलत टाटा ॲक्ट्रेक (TATA ACTREC) यांच्या समन्वयातून नेरूळ येथील महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालयात 10 रूग्णखाटांची डे केअर केमोथेरपी युनीट (Day Care Chemotheropy Unit ) सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

  या कॅन्सर डे केअर सेंटरमध्ये आज पहिला रूग्ण संदर्भित होऊन या रूग्णावर केमोथेरपी उपचार करण्यात आला आणि या सेंटरमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाली. यावेळी महानगरपालिकेच्या वैद्यकिय समुहासह टाटा ॲक्ट्रेक यांचाही वैद्यकिय समुह उपस्थित होता.

   डे केअर केमोथेरपी ही सध्याची प्रभावी आणि रुग्णकेंद्रित उपचार पद्धती असून ज्यामुळे केमोथेरपीसाठी नियमित हॉस्पिटलायझेशनची गरज कमी करते. त्यामुळे रुग्णाच्या वेळेची व साधनांची बचत होते. याच उद्देशाने नमुंमपाच्या आरोग्य विभागांतर्गत माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथे टाटा ॲक्ट्रेक यांचे समन्वयाने 10 रुग्णखाटांचे डे केअर केमोथेरपी युनीट सुरु करण्यात आले आहे.

          नेरूळ रूग्णालयामध्ये हे डे केअर सेंटर सकाळी 8 वाजल्यापासून कार्यान्वित राहील. रुग्णांवर उपचाराकरिता येथे फिजीशिअन, स्टाफ नर्सेस व आवश्यकतेनुसार इतर विशेषज्ज्ञ उपलब्ध असणार आहेत. हे डे केअर सेंटर सुरु करणेकरिता कॅन्सर उपचार संबधित सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना टाटा ॲक्ट्रेक, खारघर येथे प्रशिक्षणाकरिता पाठविण्यात आले होते. सॉलीड ट्युमर्स (Solid Tumors) च्या रुग्णांवर या डे केअर सेंटर (Day Care center) मध्ये उपचार करण्यात येणार आहेत.

          सदर उपचाराचे निदान व केमोथेरपीचा पहिला डोस टाटा अँक्ट्रेक येथे देण्यात येईल व रुग्ण हायमोडायनॅमिकली स्टेबल (Haemodynamically stable) असल्यास व ज्या रुग्णांना अतिदक्षता विभागाची (ICU) आवश्यकता नसेल अशा नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांना केमोथेरपीच्या (Chemotherapy) दुस-या डोसपासून या डे केअर सेंटरमध्ये उपचार दिले जातील.

          यामुळे नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्थानिक रहिवाशांना टाटा रुग्णालयापर्यंत जावे न लागता नवी मुंबईतच नमुंमपाच्या नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयात औषधोपचाराचा लाभ घेता येईल. त्यामुळे टाटा रुग्णालयात दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अपॉईंटमेंट मिळाल्यावर उपचारांकरिता अगदी पहाटेसुध्दा उठून जाण्याची व दिवसभर रांगेत थांबण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे नवी मुंबईतील कर्करोगाच्या रुग्णांना होणारा शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास कमी होणार आहे.0000000

संबंधित पोस्ट

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यात डाळींचा पुरेसा साठा उपलब्ध-अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेची २०२५-२६ ची मालमत्ताकर बिले आता ऑनलाईन उपलब्ध, नवी मुंबई महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय : यंदा प्रथमच ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरल्यास मिळणार १०% अर्ली बर्ड सवलत; तसेच बिल वाटपासाठी बचत गटांच्या महिलांचा सहभाग

आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा…

बांधकाम साईटवरील कामगार सुरक्षा विषयक विशेष जागरुकता शिबीर संपन्न,बांधकाम कामगार सुरक्षेविषयी शिबीर आयोजित करणारी नवी मुंबई पहिली महानगरपालिका..

vishwatmaklokswamivarta

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मॅट्रिकपूर्व योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत..