vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भोकरदनमध्ये शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक समर्थन कार्यक्रम संजय राऊतांवरील आरोपांमागे राजकीय सूडभावना –खासदार राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी

भोकरदनमध्ये शिवसेनेचा शक्तीप्रदर्शनात्मक समर्थन कार्यक्रम संजय राऊतांवरील आरोपांमागे राजकीय सूडभावना –खासदार राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी

भोकरदन, प्रतिनिधी)-राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणातआरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे राज्यसभेचे खासदार तथा सामनाचे मुख्य संपादक संजय राऊत यांच्या समर्थनार्थ भोकरदन शहरात शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. महात्मा फुले चौक येथे आयोजित कार्यक्रमात राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी बोलताना शहरप्रमुख महेश पुरोहित यांनी संजय राऊत यांच्याविरोधात सुरू असलेल्या घडामोडींना ‘राजकीय षडयंत्र’ असल्याचा आरोप केला.शिवसेनेचा आवाज बुलंदपणे मांडणार्‍या नेत्याला बदनाम करण्यासाठी काहीभाडोत्री कार्यकर्त्यांचा वापर करत आहेत. मात्र शिवसैनिक कोणत्याहीदबावाला बळी पडणार नाहीत, असे ते म्हणाले. राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये संजय राऊत हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत असल्याने तेसत्ताधार्‍यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये दिसून आली.या कार्यक्रमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ग्रामीण भागातही आपली संघटनात्मक ताकद कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षनिष्ठा व्यक्त केली.‘अफवा आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणार्‍या प्रचाराला बळी पडू नका,’असे आवाहनही पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना केले. यावेळी प्रदीप पैठणकर,रवि सुरसे, संतोष सुरडकर, बालू जाधव, अशोक साबले, कृष्णा तराल, योगेशपुंड, बबन शिंदे, आकाश सुरडकर, प्रल्हाद ओमकार, राजू शैलके, दत्तूसुरडकर,नदन कचके, संजय आक्से, संदीप लाड, अन्ना सुरडकर यांच्यासहशिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००फोटो ओळी……७-खासदार तथा सामनाचे मुख्य संपादक संजय राऊत यांच्या समर्थनार्थ भोकरदनशहरात शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करुन राऊत यांच्या प्रतिमेलादुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली.

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा न्यायालयाचा शासनाच्या बाजूने निकाल,- न्यायालयाने शेतकऱ्यांचा मनाई हुकुमाचा अर्ज फेटाळला- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीलाच अण्णाभाऊ प्रेमींना मिळाली भेट- वाटेगाव येथे साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक..

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त**केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ*1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवातमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग…

vishwatmaklokswamivarta

वाचन, विज्ञान, कवितांच्या मैफलीने ग्रंथोत्सवात रंगत-दोन दिवसीय सांगली ग्रंथोत्सव 2024 ची सांगता

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य दुर्गम भागात पोहोचवणार – न्यायमूर्ती भूषण गवई

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…