vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; महाबोधी गयामंदिर : बिहार हे तिर्थक्षेत्र निश्चित ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्यासाठी २२ मे पर्यत अर्ज सादर करावा

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; महाबोधी गयामंदिर : बिहार हे तिर्थक्षेत्र निश्चित ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्यासाठी २२ मे पर्यत अर्ज सादर करावा

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी – राज्यातील सर्व धर्मीर्यांमधील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील व देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबविण्याचे घोषित केले आहे. बौध्द धर्मातील चार प्रमुख पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या बिहार राज्यातील महाबोधी गयामंदीर, बोधगया हे तिर्थक्ष्‍ोत्र निश्चित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत दि .3 जून 2026 रोजी महाबोधी गया मंदिर, बोधगया, बिहार येथे रेल्वेने जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांच्याकडे दि. 22 मे 2026 पर्यत अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरीकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एका यात्रेकरीता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे, तसेच प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार असावे तसेच लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहीवासी असावा व वय 60 किंवा त्या वरील ज्येष्ठ नागरीक असावा. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी (ज्यांचे वय 60 पेक्षा कमी असेल) किंवा सहायक (ज्यांचे वय 21 ते 50 वर्ष असेल) यापैकी एकाला त्यांच्यासोबत नेण्याची परवानगी असेल.

जिल्ह्यातील ज्या ज्येष्ठ नागरिकांना बौध्द गया मंदीर बिहार येथे रेल्वेने जावयाचे आहे त्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण येथे संपर्क साधावा.

000000

संबंधित पोस्ट

नक्शा’ पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ ड्रोन सर्वेक्षण होणारØ जमिनींचे ३डी नकाशे, मिळकत पत्रिका तयार होणार जागेची सीमा निश्चित होण्यास मदत..

vishwatmaklokswamivarta

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना;कन्नड तालुक्यात ६० लाभार्थ्यांना ९१ हे.जमिनीचे वाटप..

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश….

इंडियन आर्मी टेरियर सायबर क्वेस्ट 2025 : कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र शिक्षण, क्वांटम आणि ड्रोन तंत्रज्ञानावर भर असलेली राष्ट्रीय सायबर स्पर्धा