vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम – शहराच्या अंतर्गत भागातही मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता..

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम – शहराच्या अंतर्गत भागातही मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता..

 

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबईतील मुख्य रस्त्यांप्रमाणेच अंतर्गत भागातही सखोल स्वच्छता मोहीमा राबवून हवा गुणवत्तेच्या दृष्टीने दररोज सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज रविवारच्या दिवशी शहरातील मुख्य वर्दळीच्या सायन पनवेल महामार्गावर वाशी ते बेलापूरकडे जाणा-या मार्गिकेची साफसफाई करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते व पदपथ याकडेला साचलेली माती ब्रशने खरवडून काढण्यात आली व संकलित करून हलविण्यात आली तसेच प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुवून घेण्यात आले. यासाठी जेटींग स्प्रेचा वापर करण्यात आला.

          सायन पनवेल महामार्गाप्रमाणेच सेक्टर 17 कोपरखैरणे मुख्य मार्ग, रिलायबल टेक पार्क ऐरोली, गजानन चौक ते शापुरजी पालनजी साईट सेक्टर 6 सानपाडा, जुहूगांव मुख्य रस्ता, शिरवणेगाव अंतर्गत मुख्य रस्ता, जिजामाता नगर घणसेली अशा शहराच्या अंतर्गत भागातील मुख्य रस्त्यांचीही सखोल स्वच्छता करण्यात आली.

          हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यांवरील व रस्त्यांकडेची माती साफ करण्याकरिता या सखोल स्वच्छता मोहीमा महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने आणि नियमितपणे राबविण्यात येत असून त्यासोबत एनकॅपच्या वाहनांव्दारे हवेत प्रक्रियाकृत पाण्याची कारंज्यासारखी फवारणी करून हवेतील धूळीचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे.

          त्या अनुषंगाने रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही या सखोल स्वच्छता मोहीमा सायन पनवेल महामार्गावर वाशी ते बेलापूर पर्यंत तसेच अंतर्गत मुख्य रस्त्यांवर अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.रविंद्र इंगळे व स्वच्छता अधिकारी यांच्या माध्यमातून राबविण्यात आल्या. यामध्ये अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी मिळून 350 हून अधिक जणांनी सक्रिय सहभाग घेतला.

0000

संबंधित पोस्ट

सारथी ऑनलाईन प्रणालीवर फेसलेस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

नीट’ परीक्षा केंद्रांवरील सुविधांची खातरजमा करा; विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सूचनांचे काटेकोर पालन करा-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• परीक्षेच्या पूर्वतयारी, सज्जतेचा आढावा• प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त; वैद्यकीय पथके तैनात• सीसीटीव्ही कार्यान्वित; ड्युटी मॅजिस्ट्रेट व स्टेट ऑब्झर्वर यांची नियुक्ती

नवी मुंबई पोलिसांच्या ASI पी. एन. पाटील यांनी लॉजच्या खोलीत आत्महत्या केली; 8 पानांच्या सुसाईड नोट आणि मोबाईल व्हिडिओमध्ये मृत्यूच्या कारणांचा उल्लेख वरिष्ठ अधिकारी छळवणूक करत असल्याचा आरोप

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी -आज दि.४ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली 

जनगणना 2027 मध्ये नागरिक ऑनलाईन पोर्टलव्दारे करू शकतात स्वगणना…

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

vishwatmaklokswamivarta