vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एकल प्‍लास्‍टीक यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्‍यावर भर – अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अर्जुन गिराम.

 एकल प्‍लास्‍टीक यापुढे शहरात नियमितपणे कार्यवाही करण्‍यावर भर – अतिरिक्‍त आयुक्‍त श्री. अर्जुन गिराम.

राज्य प्रतिनिधी

जालना शहर महानगरपालिकेतील नवीन जालना व जुना जालना विभागातील सर्व स्‍वच्‍छता निरीक्षकांमार्फत शहरात एकल प्‍लास्‍टीक (Single Use Plastic) बाबत कारवाई करण्‍यात आली. यामध्‍ये शहरातील दुकानदार/आस्‍थापनामध्‍ये प्‍लास्‍टीक साठाबाबत माहिती मिळाल्‍यानुसार आज दिनांक ०३.११.२०२५ रोजी दुकानदार/आस्‍थापना सुमीत एजन्‍सी, फुले मार्केट, नवीन जालना यांच्‍याकडे प्‍लास्‍टीक आढळुन आल्‍याबाबत त्‍यांच्‍यावर ५,०००/- अक्षरी पाच हजार रुपये दंड व ०२ कुंटल ९४ किलो प्‍लास्‍टीक जप्‍त करण्‍यात आले. तसेच जुना जालना विभागामध्‍ये ०६ हजार दंड असे एकुण ११०००/- रुपये दंड वसुल करण्‍यात आला.    सदरच्‍या कार्यवाही ही मा. जिल्‍हाधिकारी तथा आयुक्‍त तथा प्रशासक जालना शहर महानगरपालिका यांच्‍या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्‍त आयुक्‍त, सहायक आयुक्‍त सर्व स्‍वच्‍छता निरीक्षक व इतर कर्मचारी यांच्‍या उपस्थितीमध्‍ये करण्‍यात आली.

   करिता जालना शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व आस्‍थापना/दुकानदार व नागरिक यांना आवाहन करण्‍यात येते की, जालना शहर महानगरपालिका व महाराष्‍ट्र प्रदुषण मंडळामार्फत याबाबत नियमितपणे तपासणी/पाहणी करण्‍यात आहे. प्‍लास्‍टीक वापरकर्त्‍यांवर दंडनीय कार्यवाही करुन गुन्‍हा नोंद करण्‍याबाबतची देखील कार्यवाही करण्‍यात येणार आहे. करिता एकल प्‍लास्‍टीकचा (Single Use Plastic) वापर, वाहतुक, विक्री व साठा करु नये याबाबत सहकार्य करावे तसेच शहरात ज्‍याठिकाणी प्‍लास्‍टीक वाहतुक, विक्री, वापर व साठा होत असेल तर याबाबत जालना मनपास अवगत करुन सहकार्य करावे असे आवाहन करण्‍यात येत आहे.

संबंधित पोस्ट

निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे नांदेडमध्ये दाखल

व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा जागर; डि.जे.पी. कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धा उत्साहात.

इमाव, विमाप्र,विजा,भज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश 

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

गाडगेबाबा जयंती निमित्त बौद्ध वधु वर परिचय मेळावा संपन्न दिडशे उपवर मुलामुलींनी दिला परिचय ऋणानुबंध संस्थेचा अभिनव उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व महामार्ग आणि राज्य मार्ग यासह रस्त्यांवर देशी झाडांची लागवड करण्याच्या सूचना- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले झाडे जगवण्यासाठीही यंत्रणा उभारून नियमित तपासणी करणार…