vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इमाव, विमाप्र,विजा,भज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश 

इमाव, विमाप्र,विजा,भज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ तसेच भ.ज.-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ अंतर्गत व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.

 सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावे,असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दयानंद कोकरे यांनी केले आहे.

 या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय दि. १२ ऑगस्ट २०२६ पासून ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेऊन शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी “ऑनलाइन अर्ज पोर्टल” https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ऑनलाइन सादर करावा.

 ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ ही इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती (भज-क प्रवर्ग वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी असून, ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना’ ही केवळ भज-क प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी आहे.

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित प्रक्रियेनुसार ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दयानंद कोकरे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया करच’- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक !

महाराष्ट्र शासनाच्या कृतीशील धोरणामुळे क्रीडापटूंना स्थैर्य आणि सन्मान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील३७२ क्रीडापटूंचे शासकीय सेवेत थेट समावेशन,सांगलीत अखिल भारतीय कनॉईंग, कयाकिंग स्पर्धांचे उत्साही उद्घाटन

नवीन रास्त भाव दुकानांसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पुरवठा विभागाचे आवाहन*

ज्या महाराष्ट्रात थोडा जरी आरोप झाला तरी मंत्रीपदाचा राजीनामा घेतलाvजायचा आज त्याच महाराष्ट्रात अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही राजीनामा घेतला जात नाही ही सत्ताधार्‍यांची हतबलता :-जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

हवा गुणवत्तेसाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाहीवर भर देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम निरंतर सुरू राहणार- उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे,मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या अभियानांतर्गत श्रमदान

vishwatmaklokswamivarta