vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी २.० अर्ज प्रक्रिया सुरूनवीन ‘महाआयडी’ अनिवार्य; अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या महाविद्यालयांना सूचना..

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी २.० अर्ज प्रक्रिया सुरूनवीन ‘महाआयडी’ अनिवार्य; अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या महाविद्यालयांना सूचना..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा नवीन महाआयडी करणे अनिवार्य असून कोणत्याही परिस्थितीत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवू नये असे निर्देश संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यात आले आहेत,असे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी कळविले आहे.

नवीन ‘महाआयडी’ आवश्यकमहाडीबीटी २.० पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना नवीन महाआयडी (Maha ID) तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युझर आयडी अथवा पासवर्डची आवश्यकता राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाच्या आधारे नवीन महाआयडी तयार करावा. आधारशी संलग्न पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल तसेच बँक खात्याची माहिती अचूक व अद्ययावत असल्याची खात्री करावी. अर्ज करताना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रके तसेच योजनेसाठी आवश्यक अन्य कागदपत्रे स्पष्ट पीडीएफ (PDF) स्वरूपात अपलोड करावीत. नवीन (Fresh) तसेच नूतनीकरण (Renewal) अशा दोन्ही प्रकारच्या अर्जांसाठी नवीन महाआयडी अथवा आधार आधारित लॉगिन आवश्यक आहे. नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॉगिननंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करावा’ हा पर्याय निवडावा.भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत संबंधित महाविद्यालयाकडून शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस शिक्षण शुल्क घेतले जात नसल्याने केंद्र शासनाचा हिस्सा विद्यार्थ्यांच्या खात्यात प्राप्त झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयास अदा करावी.

महाविद्यालयांसाठी केवळ प्राचार्य लॉगिन, महाडीबीटी २.० प्रणालीमध्ये महाविद्यालयासाठी आता केवळ प्राचार्यांचे एकच लॉगिन उपलब्ध राहणार असून, लिपिक लॉगिन बंद करण्यात आले आहे. लॉगिन किंवा पासवर्डसंदर्भात अडचण असल्यास संबंधित महाविद्यालयाने आपल्या शैक्षणिक विभागाशी संपर्क साधावा.महाविद्यालयांनी पोर्टलवर आपले प्रोफाइल तपासून अभ्यासक्रमनिहाय निश्चित करण्यात आलेली शुल्क रचना (Fee Structure) तातडीने अद्ययावत करावी. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवू नयेत. विहित मुदतीत अर्ज मंजूर करून पुढे पाठविण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील.

असा भरावा ऑनलाइन अर्जविद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर* “https:// mahadbt2.maharashtra.gov.in” या पोर्टलला भेट द्यावी. पोर्टलवरील लॉगिन टॅबमध्ये ‘नागरिकांसाठी लॉगिन’ अथवा ‘महाआयडीशिवाय प्रवेश करा’ या पर्यायाचा वापर करून आधार आधारित लॉगिन करता येईल. आधारशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीद्वारे लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी.लॉगिननंतर पात्रतेसंबंधी आवश्यक माहिती अद्ययावत केल्यानंतर लागू असलेल्या विभागनिहाय योजनांची यादी उपलब्ध होईल. संबंधित योजनेसमोरील ‘पहा’ या पर्यायावर क्लिक केल्यास योजनेचा संपूर्ण तपशील पाहता येईल. त्यानंतर ‘Apply’ या पर्यायावर क्लिक करून वैयक्तिक माहिती, चालू व मागील शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे भरून अर्ज ऑनलाइन सादर करावा. अर्जाची प्रत प्रिंट अथवा पीडीएफ स्वरूपात जतन करून ठेवावी.जात, प्रवर्ग, महाराष्ट्रातील रहिवास, दिव्यांगत्व, कौटुंबिक उत्पन्न आदी माहिती पोर्टलवर काळजीपूर्वक व अचूक भरावी.

शुल्क आकारणी नाही,महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी व अर्ज भरण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. अनुसूचित जाती प्रवर्गातील कोणत्याही पात्र विद्यार्थ्याकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची रक्कम घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच महाविद्यालयाचे नाव, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचा कालावधी, अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता, महाविद्यालय व अभ्यासक्रमांच्या मान्यतेचे आदेश आणि शुल्क रचना आदी माहिती पोर्टलवर मॅप करण्यासाठी संबंधित संचालनालय, विद्यापीठ, परिषद अथवा शुल्क नियामक प्राधिकरण (FRA) यांच्यामार्फत आवश्यक कार्यवाही करावी. महाडीबीटी २.० संदर्भातील अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८०० / १८००१०२५३११ या क्रमांकांवर अथवा helpdesk@mahadbt.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल. तांत्रिक किंवा प्रशासकीय तक्रारींसाठी संबंधित लॉगिनमधून स्क्रीनशॉटसह ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा कारागृहात वृक्षारोपणाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्नांना मिळणार व्यासपीठ;पालकमंत्री चंद्रकांत पाटील साधणार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वीपणे राबवा – सभापती प्रा. राम शिंदे सक्षम ग्रामपंचायतींवरच महाराष्ट्राचा विकास अवलंबून – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली, उप समिती प्रस्ताव तयार करत असल्याची चर्चा..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने-पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान..

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार सहकुटुंब शासकीय महापूजा संपन्न बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीवभाव…

vishwatmaklokswamivarta