vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना; पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन*

*मागासवर्गीयांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना; पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन*

जालना, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य प्रशिक्षण विकास योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना, बीजभांडवल योजना तसेच थेट कर्ज योजना आदी विविध योजना राबविण्यात येतात.

जालना जिल्ह्यात संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, स्व. विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुळस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ आणि आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह www.msobcfdc.org या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे. अधिका माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादीत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना दूरध्वनी क्र. 02482-223420 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जालना यांनी केले आहे.

 

****

संबंधित पोस्ट

कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार– वनमंत्री गणेश नाईक

केईएम रुग्णालय स्थित ‘मा आयव्हीएफ केंद्र’ चे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न यावेळी मुंबईच्या महापौर रितू तावडे उपमहापौर संजय घाडी आणि मान्यवर उपस्थित

विज्ञानविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेत नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांचा ज्ञानसंपन्न उत्साही सहभाग…

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

vishwatmaklokswamivarta

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रिंग रोडसाठी नव्याने प्रस्ताव तयार करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र महापालिकेकडे लवकरात लवकर हस्तांतरित करा· महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी एक हजार पंधरा तरुणांनी उभारले स्वतःचे उद्योग…