vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट

            मुंबई, प्रतिनिधी : असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे मानद सचिव डॉ. आगम वोरा यांच्या नेतृत्वाखालील संस्थेच्या सदस्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय महत्त्वाची दोन वैद्यकीय प्रकाशने भेट दिली

   यापैकी पहिले प्रकाशन ‘Unified Consensus on Adult Immunization 2026’ हे असून, ते इंडियन मेडिकल असोसिएशनने विविध विविध वैद्यकीय संस्थांच्या सहकार्याने प्रकाशित केले आहे. प्रौढांच्या लसीकरणाबाबत तज्ज्ञांचे एकत्रित मार्गदर्शन आणि शिफारसी या प्रकाशनात देण्यात आल्या आहेत असे डॉ. वोरा यांनी सांगितले. दरवर्षी विषाणूजन्य संसर्गामुळे देशातील पाच लाख लोक मृत्युमुखी पडतात. लसीकरणामुळे हे मृत्यू टाळता येतील असे डॉ. वोरा यांनी यावेळी सांगितले.

      दुसरे प्रकाशन ‘COPD Compass 2026’ या शीर्षकाचे असून, हे भारतातील COPD (Chronic Obstructive Pulmonary Disease – दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकार) व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. भारतातील COPD व्यवस्थापनासंदर्भात तज्ज्ञांच्या पॅनेलने केलेल्या शिफारसींचा यामध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. दीर्घकालीन अवरोधक फुफ्फुसविकारांचे निदान कसे करायचे व उपचार कसा करायचा या संदर्भात दुसऱ्या पुस्स्तकात मार्गदर्शन असल्याचे वोरा यांनी सांगितले.

     यावेळी डॉ. राकेश बडदे, डॉ. मिलिंद नाडकर्णी, डॉ. अमित सराफ, डॉ. जयस लेले, आशुतोष पांडे तसेच झायडस हेल्थकेअरच्या एम.डी. स्वाती दलाल यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विधानसभा लक्षवेधी सूचना :भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवरीलकारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी दोन हजार वारकऱ्यांची उपस्थिती !देव, देश, धर्म यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर कारवाई करा !- महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरआज विराट जनआक्रोश मोर्चा जिल्हाभरातील भुमिहिन, बेघर, कास्तकर सहभागी होणार..

जिल्ह्यात प्राणी कल्याण कायद्याच प्रभावीपणे अंमलबजावणी करावी- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta