vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऐतिहासिक #सातारा नगरीत साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ

ऐतिहासिक #सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ

राज्य प्रतिनिधी 📍 सातारा

ऐतिहासिक #सातारा नगरीत आज साहित्य आणि विचारांच्या अभूतपूर्व संगमातून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ झाला. ‘स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी’ (शाहू क्रीडा संकुल) येथे ध्वजारोहणाच्या मंगल सोहळ्याने या साहित्यकुंभाचा दिमाखदार शुभारंभ झाला.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा-शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे १ ते ४ जानेवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

या ऐतिहासिक प्रसंगी ९८ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाहक सुनीताराजे पवार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी, संदीप शहा, रवींद्र बेडकीहाळ यांसह अनेक साहित्यिक, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीने महाराष्ट्र राज्याची संस्कृती परंपरा संत वाङ्ममय आणि साहित्य यांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या.

#अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलन

संबंधित पोस्ट

जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या” — आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

सर्वोच्च न्यायालयात विशेष लोकअदालत;३१ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आगामी शाळा प्रवेश उत्सव भव्य व गुणवत्तापूर्ण करावा

सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी

राज्यातील काही भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान- कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागात वादळी पावसाची शक्यता.. हवामान खात्याचा अंदाज

650 व्या संत रोहिदास जयंती निमित्त माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta