vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रुद्रांश पाटीलच्या कामगिरीने ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या रुद्रांश पाटीलचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले अभिनंदन.

रुद्रांश पाटीलच्या कामगिरीने ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा-आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या रुद्रांश पाटीलचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले अभिनंदन.

ठाणे प्रतिनिधी) : आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावून दैदिप्यमान कामगिरी करत देशासाठी पदकांची कमाई करणारा ठाणेकर नेमबाज रुद्रांक्ष हेमांगिनी बाळासाहेब पाटील याचे आज सकाळी धर्मवीर आनंद दिघे ठाणे प्रवेशद्वार,आनंदनगर येथे ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागातर्फे उत्स्फूर्त स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रुद्रांश पाटील याचे कौतुक केले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

रुद्रांश बाळासाहेब पाटील याच्या स्वागतासाठी आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, नगरसेविका नम्रता भोसले, उपायुक्त क्रीडा मीनल पालांडे, अभ‍िनेते मंगेश देसाई यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रुद्रांक्ष पाटीलने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत हिमांशू ढिल्लों आणि पार्थ माने यांच्यासोबत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. त्यानंतर वैयक्तिक स्पर्धेतही रुद्रांक्षने कांस्यपदक व सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

रुद्रांक्षच्या या कामगिरीमुळे ठाण्याच्या क्रीडा क्षेत्राची देश-विदेशात पुन्हा एकदा दखल घेतली गेली आहे. यापूर्वीही रुद्रांक्षने जागतिक पातळीवर तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश मिळविले आहे. २०२२ च्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफलमध्ये त्याने वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले होते.

यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी रुद्रांक्षचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. “रुद्रांक्षने आपल्या अचूक नेमबाजीने ठाण्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाचा ठाणेकरांना अभिमान असल्याचे नमूद करीत महापौरांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रुद्रांक्षच्या यशामुळे ठाण्यातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याचे महापौरांनी नमूद केले आहे

संबंधित पोस्ट

नीट (युजी) 2026 प्रवेश परिक्षार्थीची होणार वैद्यकीय तपासणी

कुकडी व घोड प्रकल्पातील प्रलंबित कामांचा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा,कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही

पुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने समन्वयाने काम करा- प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी

पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची मान्यता**मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत 22 हजार 611 कोटी रूपयांच्या प्रस्तावाला मान्यता*