vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत! शासनाचा पगार व धर्मांतराचा अड्डा; फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? – हिंदू संघटनांचा सवाल

सोलापूर येथील बेकायदेशीर चर्च सील; हिंदू संघटनांकडून कारवाईचे स्वागत! शासनाचा पगार व धर्मांतराचा अड्डा; फसवणूक करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक कधी करणार? – हिंदू संघटनांचा सवाल

 राज्य प्रतिनिधी- सोलापूर : बापूजीनगर येथील म्हाडा संकुलातील समाजमंदिरात गेली २५ वर्षे राजरोसपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर चर्चवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अखेर सील ठोकले आहे. हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या धडक कारवाईचे स्वागत केले आहे; मात्र केवळ वास्तू सील करून हा विषय संपत नसून, हिंदू आरक्षणाचा लाभ घेऊन राज्य शासनाची घोर फसवणूक करणारा आणि या धर्मांतर रॅकेटचा मुख्य सूत्रधार ख्रिश्चन पास्टर दत्तात्रय कानेपागूल उर्फ येहान मार्क याला बेड्या कधी ठोकणार, असा खडा सवाल हिंदु संघटनांनी प्रशासनाला विचारला आहे. आज सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही संतप्त मागणी करण्यात आली.

 सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेतला श्री. रवी गोणे (शहर अध्यक्ष, हिंदु राष्ट्र सेना), श्री. आनंद मुसळे (शहर संघटक, हिंदु राष्ट्र सेना), श्री. प्रकाश आसादे (हिंदु राष्ट्र सेना), श्री. राजन बुणगे (सोलापूर जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती), कु. वर्षा जेवळे (सोलापूर, हिंदु जनजागृती समिती) आणि अधिवक्ता चंद्रशेखर वारद (राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती) हे उपस्थित होते.

   दत्तात्रय कानेपागूल हा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कारकून म्हणून कार्यरत आहे. त्याने ‘हिंदू मोची’ या जातीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी लाटली. मात्र, प्रत्यक्षात ख्रिश्चन धर्म स्वीकारून तो ‘येहान मार्क’ या नावाने ‘जिजस गॉस्पल सोसायटी’ या चर्चचा पास्टर म्हणून धर्मांतराचे उद्योग चालवत आहे. हा प्रकार म्हणजे केवळ राज्य शासनाचीच नव्हे, तर खऱ्या मागासवर्गीयांच्या हक्कांची घोर फसवणूक आहे. त्यामुळे या बोगस कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून कायमचे बडतर्फ करावे; तसेच त्याने आतापर्यंत लाटलेला पगार आणि सर्व शासकीय सवलती त्याच्याकडून चक्रवाढ व्याजासह वसूल कराव्यात, अशी भूमिका संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

   कारवाईची कुणकुण लागताच या मंडळींनी प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी रातोरात चर्चवरील क्रॉस काढून पुरावा नष्ट करण्याचा दांभिक प्रकार केला आहे. शासकीय वास्तूचा बेकायदेशीर वापर करण्यासोबतच, कानेपागूल याने तिथे ध्वनिक्षेपक लावून हिंदू देवी-देवतांची अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिंगलटवाळी केली. यामुळे परिसरात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्यात आली. भोळ्याभाबड्या गरीब हिंदूंची फसवणूक करण्यात आली. या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत प्रशासनाने त्याच्यावर आणि ‘जिजस गॉस्पल सोसायटी’च्या पदाधिकाऱ्यांवर माहिती लपवणे, पुरावा नष्ट करणे यासह नवीन ‘भारतीय न्याय संहिता’, ‘धर्मांतर विरोधी कायदा’ आणि ‘अनुसूचित जाती पडताळणी कायद्या’नुसार तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच, भाडेकरारातील अटींचा उघडभंग केल्याप्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी ‘जिजस गॉस्पल सोसायटी’ची (नोंदणी क्र.: F-15287) ट्रस्ट मान्यता तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

  भोळ्या आणि गरीब हिंदूंना पैशाचे आमिष दाखवून धर्मांतराच्या जाळ्यात ओढणाऱ्या या मोठ्या षडयंत्रामागे नेमके कोण आहे आणि यासाठी पैसा कुठून येत आहे, याची राज्य शासनाने सखोल चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच राज्यभरात इतरत्र कुठेही समाजमंदिरांचा असा गैरवापर होत असल्यास त्याचीही तातडीने चौकशी व्हावी. प्रशासनाने पास्टर दत्तात्रय कानेपागूल याला पाठीशी न घालता तात्काळ अटक करावी, अन्यथा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना व अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या वेळी देण्यात श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय लोकअदालतीचे दि.22 मार्च रोजी आयोजन

vishwatmaklokswamivarta

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे इंदू मिल येथील स्मारकाची पाहणी…

एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद संपन्न जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात रोटर चालवून केली चिखलणी; अधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार – डॉ हर्षदीप कांबळे चवदार तळे सत्याग्रह दिन बार्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे केला साजरा

जलजागृती पंधरवड्यानिमित्त साई एन्जेल स्कूलमध्ये जलप्रतिज्ञा 

पोलीस पाटील हा प्रशासनाचा कणा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे