vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई, प्रतिनिधी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ होती. मात्र राज्यात उद्भवलेले अवकाळी पावसाचे व गारपीटीचे संकट, तसेच लाभार्थी महिलांकडून झालेली मागणी यांचा विचार करून ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-केवायसी अपूर्ण आहे, ज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी ३० एप्रिल पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

0000

संबंधित पोस्ट

जालना सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन सतर्क* *मॉक ड्रिल, सागरी व मर्मस्थळ सुरक्षा वाढवली*

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न…

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत;**पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश*

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा*- *पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता