vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजय मिसाळ 

महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजय मिसाळ

जालना प्रतिनिधी : जिल्ह्यातील नामवंत पैलवान संजय मिसाळ यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जालना जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांच्या हस्ते पैलवान संजय मिसाळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे

पैलवान संजय मिसाळ यांनी १९९२ ते १९९६ या कालावधीत पुणे येथील गोकुळ वस्ताद तालीम येथे गुरुवर्य रुस्तुम ए हिंद  पै.हरिश्चंद्र बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव करत महाराष्ट्रातील अनेक नामांकित कुस्ती मैदानांमध्ये दमदार कामगिरी केली आणि ‘महाराष्ट्र चॅम्पियन’ हा मानाचा किताब पटकावला.

आजही ते जालना जिल्ह्यात स्वखर्चाने दरवर्षी कुस्ती मैदानाचे आयोजन करतात. अनेक गरीब व होतकरू पैलवानांना आर्थिक व सर्वतोपरी मदत करून त्यांना पुढे आणण्याचे कार्य ते सातत्याने करत आहेत. जालना जिल्ह्यात अधिकाधिक गुणवंत पैलवान घडावेत आणि कुस्तीची परंपरा अधिक बळकट व्हावी, यासाठी ते अविरत प्रयत्नशील आहेत.

महाराष्ट्र कुस्ती संघटनेला विश्वास आहे की, त्यांच्या अनुभव, नेतृत्व आणि कार्यतत्परतेमुळे जालना जिल्ह्यात कुस्ती चळवळीला नवी दिशा मिळेल. जालना जिल्ह्यात कुस्तीचा विकास, तालमींचे सक्षमीकरण आणि नवोदित पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र कुस्ती संघटना नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांनी व्यक्त केला आहे.

000000

संबंधित पोस्ट

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त ३० जुलै रोजी परिसंवाद· संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा

गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वाटप

लोकशाही प्रजासत्ताक बनविण्याचा आणि मागास समाज घटकाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ” विकास स्वराज पार्टी ” कटिबद्ध..

धक्कादायक: न्यायासाठी महिलेचे आमरण उपोषण!गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका; प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची महिलेची मागणी..

महाराष्ट्र सदनात दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीमहाराष्ट्र शासनाच्या अनुकंपा तत्त्वावरील भरती धोरणातून अनेक कुटुंबांना दिलासा – निवासी आयुक्त आर. विमला

vishwatmaklokswamivarta

सहकार पुरस्कारासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ; सहकारी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन