vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वोडाफोन आयडिया कंपनीवर 32 लाख रुपयांचा रायगड ग्राहक मंचात दावा दाखल…

वोडाफोन आयडिया कंपनीवर 32 लाख रुपयांचा रायगड ग्राहक मंचात दावा दाखल…

अलिबाग:– येथील ज्येष्ठ पत्रकार, गुणवंत कामगार, आदिवासी सेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त समाजसेवक रायगड भूषण प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांच्या वोडाफोन आयडियाच्या कंपनीने त्यांचा वोडाफोन कंपनीचा जगप्रसिद्ध फोन क्रमांक बंद केल्याने अलिबाग मधील प्रसिद्ध वकील ॲड. अजय उपाध्ये यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रायगड अलिबाग यांच्याकडे 32 लाख रुपयांचा दावा 11 मे 2026 रोजी दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार डॉक्टर जयपाल परशुराम पाटील हे अलिबागचे कायम रहिवासी असून व्यवसायाने ज्येष्ठ पत्रकार आहेत. गेली अनेक वर्ष विविध वृत्तपत्राचा संपादक, उपसंपादक, वार्ताहार म्हणून 40 वर्ष काम केले व करीत आहेत. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनचे देशभरात कार्य केले असून आजतागायत करीत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे समाजात मानाचे स्थान आहे. आपत्ती व्यवस्थापन तज्ञ असल्याने दैनंदिन कामासाठी इंटरनेट, व्हाट्सअप आणि फेसबुक या नवीन अत्याधुनिक समाध्यमांची आवश्यकता असते. यासाठी वोडाफोन कंपनीचा 9673727277 याचा वापर करीत होते. या कार्यात महाराष्ट्र पोलीस, वकील, डॉक्टर परिचारिका,108/102 रुग्णवाहिका चालक व नागरिकांना क्रमाक तोंड पाठ होता. त्यामुळे त्यांचे सेवाभावी काम सुरळीत होत असे. दिनांक 14/2/2026 रोजी वोडाफोनचे रिचार्ज रुपये 489.30गुगलपेने पैसे देऊन रिचार्ज केला होता. खात्यामध्ये बॅलन्स असूनही वोडाफोन कंपनीने सेवा बंद केली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन त्यांना मानसिक त्रास झाला आहे. मोबाईलच्या बंद केलेल्या सेवेमुळे डॉक्टर, वकील, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस, नगरसेवक या मान्यवरांचा संपर्क तुटल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमात अडचणी निर्माण होऊन पंधरा ते वीस कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही व ते ज्येष्ठ नागरिक व अखिल भारतीय ज्येष्ठ पत्रकार संघाचे राष्ट्रीय सचिव असल्याने त्यांचा संपर्क तुटल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला. वोडाफोन कंपनीला गुगल पे द्वारे पैसे पोहोचल्याने ते कंपनीचे ग्राहक झाले त्यांना झालेल्या तसदीबद्दल दिनांक रोजी नोटीस दिली होती. त्यांनी गुणवत्तापूर्वक व दर्जेदार सेवा न दिल्याने शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रास नुकसानापोटी 32 लाख रुपये द्यावेत म्हणून ग्राहक पंचायत मध्ये दावा दाखल केला. कंपनीविरुद्ध दावा दाखल केल्याची 25,000 रुपयाची फी ॲड. अजय उपाध्ये यांनी कंपनीकडे मागणी केली आहे. या दाव्याची तारीख दिनांक २२मे २०२६ दिली असुन या केसकडे रायगडकरांचे लक्ष लागले आहे.

0000

संबंधित पोस्ट

वारकर्‍यांच्या श्रद्धास्थानांवर होणारे आघात आणि संघटन, तसेच विविध प्रश्‍नांसाठी एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

धर्माची शिकवण आणि आपत्तीत मदतीचा हात…!

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची उपस्थिती,दिप ज्योत हातमाग खादी उद्योगाची भरारी!

सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतूक नियमन

भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न*’रामराज्या’च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती*भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ!*

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक -सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक! बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढा; प्रशासकीय अपयशाचा आंदोलकांकडून निषेध*