vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतूक नियमन

सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतूक नियमन

            सांगली, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात दिनांक २७ ऑगस्ट ते दि.०६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिंदु धर्मियांचा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच दि. ०५ सप्टेंबर रोजी मुस्लिम धर्मियांचा ईद-ए-मिलाद (महंमद पैगंबर जयंती) हे सण साजरे केले जाणार आहेत. या सणांचे अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गणेश आगमन व विसर्जन मिरवणूकांचे आयोजन केले जाते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने खालीलप्रमाणे नागरिकांच्या सुविधासांठी वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात येत आहेत.

तासगाव वाहतूक बदलाबाबत -१) विट्याकडून येणारी वाहतूक ( सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) :- विटा – विटा नाका – चिंचणी नाका- चिंचणी चौक – थळेश्वर मंदीर चिंचणी – मणेराजुरी हायवे – दादा कॉलेज सांगली.२) आटपाडी कडून येणारी (सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी) :- आटपाडी -पुणदी फाटा – वाघमोडे वस्ती चिंचणी- चिंचणी चौक – थळेश्वर मंदीर चिंचणी – मणेराजुरी हायवे – दादा कॉलेज – सांगली.सांगली शहर येथील वाहतूक बदलाबाबत – ३) मिरज कडून येणारी व कोल्हापूर कडे जाणाऱ्या वाहनांसाठी :- पुष्पराज चौक – सिव्हील हॉस्पीटल झुलेलाल चौक – पत्रकार नगर कॉर्नर-आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील) .४) इस्लामपूरकडून येणारे व कोल्हापूरकडे जाणारे वाहनांसाठी :- इस्लामपूर टोल नाका – बायपास-कॉलेज कॉर्नर – आपटा चौकी- पुष्पराज चौक – सिव्हील हॉस्पीटल – झुलेलाल चौक – पत्रकार नगर कॉर्नर – आंनदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील) .५) तासगांव, विटा कडून सांगलीकडे येणारे व जाणारे वाहनांसाठी :- कॉलेज कॉर्नर – आपटा चौकी – पुष्पराज चौक – सिव्हील हॉस्पीटल-झुलेलाल चौक – पत्रकार नगर कॉर्नर -आंनदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील).

मिरज शहरातील वाहतूक बदलाबाबत६) सोलापूर कडून मिरज म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने :- तासगाव फाटा – सुभाषनगर – विजयनगर मार्गे म्हैशाळ कागवाड मार्गे कर्नाटककडे जातील. (परतीचा मार्ग हाच राहील.).७) सोलापूर कडून मिरज मार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहने :- सोलापूर – पंढरपूर – गांधी चौक – वंटमुरे कॉर्नर भारती हॉस्पीटल – विश्रामबाग – धामणी अंकली – कोल्हापूरकडे जातील. (परतीचा मार्ग हाच राहील.)८) शास्त्री चौक कडून कोल्हापूरकडे जाणारी वाहने अ) कर्नाटकातून म्हैशाळ मार्गे कोल्हापूरला जाणारी वाहने :- म्हैशाळ – शास्त्री चौक – महात्मा फुले चौक रेल्वे ब्रीज मार्गे कोल्हापूर कडे जातील.ब) कोल्हापूर कडून म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जाणारी वाहने :- अंकली फाटा – रेल्वे ब्रीज – महात्मा फुले शास्त्री चौक – म्हैशाळ मार्गे कर्नाटकात जातील.

९) कृष्णा घाट मार्गे शिरोळ तालुक्याकडे जाणारी वाहने :-अ) शास्त्री चौक – महात्मा फुले चौक – रेल्वे ब्रीज – अंकली फाटा – उदगाव मार्गे शिरोळ कोल्हापूरकडेब) कृष्णा घाट मार्गे मिरज कडे येणारी वाहने कृष्णा नदीच्या पलिकडून उदगाव – अंकली मार्गे मिरज कडे

सुभाषनगर कडून मिरजकडे येणारी वाहने :-अ) सुभाषनगर – गाडवे चौक- वखार भाग – पंचशील चौक मार्गे जवाहर चौक – शास्त्री चौक मार्गाचा वापर करतील.ब) सुभाषनगरकडून सांगली, एमआयडीसीकडे जाणारी वाहने दिंडीवेस आळतेकर हॉल – शिंदे बंगला कर्मवीर भाऊराव चौक – बसाप्पा हलवाई कॉर्नर – मिशन हॉस्पीटलच्या मार्गे सांगलीकडे जातील.

०००००

संबंधित पोस्ट

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केले पटोले कुटुंबीयांचे सांत्वन

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीच्या श्वेता कोवेच्या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन एशियन युथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पदक,श्वेताचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद..

vishwatmaklokswamivarta

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते 61,125 कोटी रु जिल्हा पतपुरवठा पुस्तिकेचे अनावरण- पीक कर्जाची मार्चअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा–जिल्हाधिकारी किशन जावळे

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी अणवाणी, दुचाकीवरुन गाठला शेतकऱ्यांचा बांध**परिस्थितीचा आढावा घेऊन दिला धीर*

vishwatmaklokswamivarta