vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री शिरसाट यांची पैठण शहरातील पूरग्रस्त भागास भेट..

पालकमंत्री शिरसाट यांची पैठण शहरातील पूरग्रस्त भागास भेट..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- अतिवृष्टी आणि जायकवाडी धरणातून झालेला विसर्ग यामुळे पैठण शहरात नदी काठच्या भागात पाणी शिरून पुरस्थिती निर्माण झाली. या पूरग्रस्त भागास आज राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भेट देऊन पाहणी केली.
आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड व पोलिस निरीक्षक महादेव गोमारे तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी पालकमंत्री शिरसाट यांनी शहरातील सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक इ.ठिकाणांचा समावेश होता.प्रशासनाने शहरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे.
श्रीनाथ हायस्कूल इमारत व अभिनंदन मंगल कार्यालयात जाऊन त्यांनी स्थलांतरित नागरीकांची विचारपूस केली. भोजन आणि निवासाबाबत सुचना दिल्या. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनास सादर करा, असे निर्देश श्री. शिरसाट यांनी केले.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

विधानसभा इतर कामकाज : २९३ अन्वये प्रस्तावावरील उत्तर शेतकऱ्यांचे हित साधणारे सरकार-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना करणार असल्याचे कृषिमंत्री यांचे विधानसभेत उत्तर

vishwatmaklokswamivarta

नाशिकला साजेसे असेच चौथे विश्व मराठी संमेलन होणार : मंत्री डॉ उदय सामंत 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 या कालावधीत नाशिकला होणार विश्व मराठी संमेलन

करियर निवड समुदेशन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक!*कुंभमेळ्यात सनातन धर्म सोप्या भाषेत समजून घेण्याची भाविकांना अनमोल संधी !*सनातन संस्थेच्या वतीने ‘सनातन संस्कृति प्रदर्शन’ आयोजन !*

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्तेखरपुडी येथे नीट, जेईई परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न