vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव वळण येथे “सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा”चे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न.. गावपातळीवरच दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर; ४४ प्रशिक्षणार्थींचा सहभाग

प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव वळण येथे “सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा”चे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न..

गावपातळीवरच दर्जेदार आरोग्य सेवा देण्यावर भर; ४४ प्रशिक्षणार्थींचा सहभाग

राज्य प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्र, डॉ. विखे पाटील यांच्या नियोजनानुसार ‘सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा’ (Comprehensive Primary Health Care – CPHC) अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण (२२,२३.९.२०२६)कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपळगाव वळण, ता. फुलंब्री येथे संपन्न झाला. या प्रशिक्षणात ४४ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेऊन प्रशिक्षण घेतले.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य व कार्यक्षमता वाढविणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. गावपातळीवरच अधिकाधिक आजारांचे निदान व उपचार करून अनावश्यक संदर्भीकरण टाळण्यासाठी ‘Resolve More, Refer Less’ या संकल्पनेनुसार काम करण्यावर भर देण्यात आला.प्रशिक्षणादरम्यान CPHCच्या १३ प्रमुख घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये माता व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, कुटुंब नियोजन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे व्यवस्थापन, डोळे-कान व मौखिक आरोग्य, वृद्धापकाळ व पॅलिएटिव्ह केअर, आपत्कालीन सेवा, मानसिक आरोग्य तसेच योग व आयुष सेवांचा समावेश होता.यासोबतच प्रभावी संवाद कौशल्य, सकारात्मक देहबोली, रुग्णांशी आपुलकीचा संवाद आणि नेतृत्व कौशल्य याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले. माता मृत्यू व बालमृत्यू कमी करणे, NCDचे वेळेत स्क्रिनिंग, नियमित गृहभेटी आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सेवा अधिक प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात आला.विविध विषयांवर डॉ. गणेश कल्याणकर, डॉ. प्रशांत दाते, डॉ. विलास विखे पाटील, डॉ. सुनंदा घोलप, डॉ. प्रफुल्ल ताकवाले, डॉ. पुष्कर दहेवाळ, डॉ. महेश मरकड, श्री. सुनील उन्हाळे, श्री. रोहित कुलकर्णी, श्रीमती सकू शेलार, श्रीमती वर्षा डोमळे आणि श्रीमती आनुसया सावरगावे यांनी मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणास समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक तसेच आशा स्वयंसेविका यांच्यासह एकूण ४४ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

गावपातळीवरच नागरिकांना सर्वंकष, गुणवत्तापूर्ण आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, तसेच गरजेनुसारच पुढील स्तरावर संदर्भ सेवा देणे, हा CPHC प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.प्रशिक्षणाचे नियोजन व यशस्वी आयोजन करण्यासाठी श्री. शिवनाथ तावडे आणि श्री. सिद्धार्थ मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

शालेय विद्यार्थ्यांना उत्तम आहार, उत्तम आरोग्याबाबत मार्गदर्शन चांगलं खा;चांगलं व्हा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

रेवसा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहिम

vishwatmaklokswamivarta

लिंग गुणोत्तर संतुलित राखण्यासाठी अधिक दक्षतेने काम करा,टीबी मुक्त भारत व पल्स पोलिओ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,आरोग्य विभागाच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा खुले कारागृहात आरोग्य तपासणी व हेपाटायटिस-बी लसीकरण

हिंद-दी-चादर’ शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त 10 ते 25 फेब्रुवारी कालावधीतनवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष आरोग्य ‍शिबीरांचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta