vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

29 सप्टेंबरला नवी मुंबईत रबाळे येथे राज्यव्यापी भव्य रोजगार मेळावा

29 सप्टेंबरला नवी मुंबईत रबाळे येथे राज्यव्यापी भव्य रोजगार मेळावा

    नवी मुंबई प्रतिनिधी      महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी भव्य राज्यव्यापी रोजगार मेळावा व प्लेसमेंट ड्राईव्ह याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६’ (‘युवाशक्ती हीच राष्ट्रशक्ती’) अंतर्गत हा रोजगार मेळावा मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रबाळे येथे आयोजित केला आहे.

विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा सहभाग –    या महाकुंभामध्ये औद्योगिक (Industrial), लॉजिस्टिक्स (Logistics), माहिती तंत्रज्ञान (IT), रिटेल (Retail), टेक्स्टाईल (Textile) तसेच सर्व्हिस (Services) या क्षेत्रांतील आघाडीच्या कंपन्या उपस्थित राहणार असून पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल.

मेळाव्याचा तपशील :     • दिनांक: मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६   • वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत  स्थळ: ठाणे बेलापूर इंडस्ट्रियल असोसिएशन, ठाणे बेलापूर हायवे, रबाळे, नवी मुंबई.

      • पात्रता: नवी मुंबई व परिसरातील सर्व महाविद्यालयीन, आयटीआय (ITI) व पदवीधर युवक-युवती. उमेदवारांसाठी आवश्यक सूचना     • सोबत आणायची कागदपत्रे :- उमेदवारांनी अद्ययावत बायोडाटा (Resume), आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि अधिकृत ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.  नोंदणी :- या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://forms.gle/vBTzRQKYBbUBt4em7 या लिंकवर जाऊन किंवा अधिकृत क्यूआर (QR) कोड स्कॅन करून गुगल फॉर्मद्वारे पूर्वनोंदणी करावी.

नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व पदवीधर व कुशल तरुणांनी या सुवर्णसंधीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

रब्बी हंगामात प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

यशकथा-उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल; जिद्दीच्या बळावर उभारला स्वतःचा उद्योग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे