vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानप्रदेश

ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी ; ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॅापचे वाटप..

ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी ; ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॅापचे वाटप..

 

राज्य प्रतिनिधी- केंद्र आणि राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यामधील एकूण १३ तालुक्यातील कार्यरत ५०४ महसूल अधिकारी व ८९ मंडळ अधिकारी असे एकूण ५९३ लॅपटॉप व ५९३ प्रिंटरचे वाटप जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात हा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत डिजिटल इंडिया लॅंड रेकॅार्ड मॅाडर्नायझेशन प्रोग्रॅम अंतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालय यांचे मान्यतेने या साहित्याचे वाटप करण्यात आले.0000

संबंधित पोस्ट

कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- बंदी नातेवाईक भेटीसाठी मुलाखत कक्षाचे उद्घाटन – कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजनमोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जम्मू कश्मीर येथील येथे झालेल्या हल्ल्याबाबत….

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

पलूस महाविद्यालयात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त शनिवारी (दि.३१) बाईक रॅली