vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दिव्यांग सशक्तीकरणाचे काम करणाऱ्या संस्था,व्यक्तीचे पुरस्कारसाठीअर्ज सादर करावेत.

दिव्यांग सशक्तीकरणाचे काम करणाऱ्या संस्था,व्यक्तीचे पुरस्कारसाठीअर्ज सादर करावेत.

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी)- दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींसाठी भारत सरकारने राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण पुरस्कार 2025 साठी अर्ज मागविले आहेत. अर्ज दिनांक 15 जुलै 2025 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या पुरस्काराने दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित केले जाते. अर्ज आणि नामांकने केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळ www.awards.gov.in वर ऑनलाइन पद्धतीने भरायची आहेत.अर्जदारांना पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील माहिती भरणे, तसेच त्यांनी केलेल्या प्रेरणादायी कार्याचे आणि योगदानाचे सविस्तर वर्णन सादर करणे आवश्यक आहे. अपूर्ण किंवा विहित नमुन्यात नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पात्रता निकष आणि इतर तपशिलांसाठी, संबंधित विभागाच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कारांसंबंधी अधिक माहितीसाठी ही www.awards.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दिव्यांग सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या संस्था आणि व्यक्तींनी आपले अर्ज त्वरित सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी, साहेबराव चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती दौरा अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण तसेच एअर इंडिया एफटीओ डेमो फ्लाईटचे उड्डाण प्रात्यक्षिक कार्यक्रमाला उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी उद्या ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालगृहांची सुविधा उपलब्ध करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे· मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*ग्रामीण पेयजल धोरण सादरीकरण बैठक*

अमली पदार्थ तस्करांवर कायद्याचा धाक यापुढेही कायम ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- 

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta