vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा- सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

सुकन्या समृद्धी खाते काढून मुलीचे भविष्य सुरक्षित करा-

सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

 

सांगली, प्रतिनिधी: सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या शिक्षणासाठी तसेच उज्वल भवितव्यासाठी फायदेशीर योजना आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत आपल्या 10 वर्षाच्या आतील मुलीचे सुकन्या समृद्धी खाते काढून आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करावे, असे आवाहन सांगली डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक बसवराज वालिकार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

केंद्र शासनाने भारतीय टपाल विभागामध्ये सुकन्या समृद्धी योजना दिनाक 22 जानेवारी 2015 पासून सुरु केलेली आहे. यावर्षी या योजनेस दहा वर्ष पूर्ण झालेली असून सांगली जिल्ह्यातील अनेक पालकांनी आपल्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले आहे. आजपर्यंत सांगली टपाल विभागात एकूण 93 हजार 235 खाती उघडलेली आहेत.

क्षेत्रीय स्तरावरती भारतीय टपाल विभागामार्फत महिला सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन मोहिमेचा भाग म्हणून 10 वर्षाखालील मुलींची सुकन्या समृद्धी योजनेची खाती उघडण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये दिनांक 1 फेब्रुवारी 2025 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुकन्या समृध्दी योजनेची खाती उघडण्यात येणार आहेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी नागरिकांनी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. वालिकार यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यातील दिवाळी शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव…

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान : महसूल समाधान शिबिर’शिबिराद्वारे 58 हजार 990 नागरिकांना दिलासाविविध दाखले, प्रमाणपत्रांचे वितरण, योजनांचा लाभ..

पोश’ कायदा व महिला सुरक्षा कायद्यांची कडक अंमलबजावणी करा; राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रशासनाला निर्देश> • सुकन्या समृद्धी, मनोधैर्य आणि ड्रोन दीदी योजनेला गती देण्याच्या सूचन • १० पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या ठिकाणी तातडीने ‘अंतर्गत तक्रार समिती’ स्थापन करा

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

vishwatmaklokswamivarta

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेत सामावून घेणार

खरीप हंगाम २०२५-२६ साठी ३ लाख मे.टन खतांचे आवंटन मंजूर,दर्जेदार कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन करा- जिल्हाधिकारी स्वामी