vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंबेनळी घाट मार्गावरील वाहतूक सुरु

आंबेनळी घाट मार्गावरील वाहतूक सुरु

रायगड प्रतिनिधी-जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्गावरील वाहतूक अखेर पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून अतिवृष्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीची परवानगी दिली जाणार आहे.

पूर्वीच्या आदेशानुसार सुरक्षिततेच्या दृष्टीने आंबेनळी घाट मार्गावर अवजड वाहतुकीस पूर्ण बंदी घालण्यात आली होती. तसेच पावसाळ्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट असताना हलक्या वाहनांनाही बंदी घालण्यात आली होती. याशिवाय रात्रीच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली होती.

दरम्यान, कार्यकारी अभियंता (कोकण), महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने घाटरस्त्यावरील सुधारणा आणि मजबुतीकरणाची कामे पूर्ण केली आहेत. ढिगारे हटविणे, अडथळे दूर करणे आणि रस्ता प्रवासासाठी सुरक्षित बनविण्याची कामे पूर्ण झाल्यामुळे रस्ता पुन्हा सुरु करण्याची मागणी करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी महाड यांच्या अहवालाचा अभ्यास करून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला, त्यानुसार आंबेनळी घाट मार्ग आता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला असून अतिवृष्टीच्या दिवसांत मात्र हा मार्ग सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद ठेवला जाईल.

००००

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यातील ताडी दुकानांचा 21 सप्टेंबरला ई-लिलाव

vishwatmaklokswamivarta

मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वेद, गीतेकडे परतण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपालांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन- पोलीस उप अधीक्षक यास्मीन इनामदार- दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर 2025 कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन

ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज. खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

अवैध धंद्यांसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्या गौणखनिज व रेती माफियांवर कठोर कारवाई करापालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निर्देश..

vishwatmaklokswamivarta