vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समन्वयातून सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न समन्वयातून सोडविणार – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई, प्रतिनिधी : सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने गतीने कार्यवाही करावी तसेच यामध्ये समाविष्ट रा इतर ज्याकडील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

मंत्रालय येथील दालनात सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत मंत्री जाधव-पाटील बोलत होते. बैठकीला आमदार आमश्या पाडवी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या ॲड. लतिका राजपूत, चेतन साळवे, पुन्या वसावे, लोक संघर्ष समितीच्या प्रतिभा शिंदे, अवर सचिव बाळासाहेब हजारे, नंदूरबारचे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगाटे, नंदूरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले की, शासन निर्णयानुसार पात्र प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करावे, टापू सर्वेक्षणातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, सरदार सरोवर प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात ड्रोन सर्व्हेक्षणामध्ये नव्याने आढळून आलेल्या शेतजमिनीचे भुसंपादन करणे, प्रकल्पग्रस्तांच्या सिंचन सुविधांचा प्रश्न, नागरी सुविधांचा प्रश्न याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. महाराष्ट्राचे प्रकल्पबाधीत ज्यांचे गुजरात मध्ये पुनर्वसन झाले आहे त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत गुजरात प्रशासनाशी संपर्क साधून समन्वयातून प्रश्न सोडविण्यात यावेत. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयांनी तोडगा काढावा अशा सूचना त्यांनी केल्या.

 

0000

संबंधित पोस्ट

आज,17 एप्रिलला गडचिरोलीत ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’आमदार अभिजित वंजारी यांच्या निधीतून ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे होणार

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नागपूर येथील एम्सचा दुसरा दीक्षान्त समारोह राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या ७८ व्या बॅच प्रशिक्षणाचा राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य समारोप

आत्मनिर्भर भारत: लखनौ येथील उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके*

निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी,जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश,मिशन मोडवर कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश..