vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याचे आवाहन

बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी १५ मे पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेचा निकाल दिनांक 2 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षा जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणार असून यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह 15 मे तर विलंब शुल्कासह 20 मे 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावीत, असे मंडळाचे सचिव डॉ.दिपक माळी यांनी कळविले आहे.

या परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी (फेब्रु. मार्च 2026 परीक्षेस प्रविष्ट न झालेले), व जून-जुलै 2026 परीक्षेसाठी नावनोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत.

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी आरटीजीएस/ एनईएफटी द्वारे 21 मे 2026 पर्यंत रक्कम भरावयाची असून 25 मे 2026 पर्यंत विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळांकडे जमा करावयाच्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्‍या श्री गुरूपौर्णिमा उत्‍सव कालावधीत तीन दिवसात साईंच्या चरणी अर्पण रु.६,३१,३१,३६२/-,सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्‍ट मात्र) इतकी देणगी प्राप्‍त झाली असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलबिंत मागण्यांबाबत थेट संवाद”संवाद मराठवाड्याशी” उपक्रमातंर्गत आठही जिल्ह्यातील दिव्यांगांनी मांडल्या अडचणी…

फळपीक विमा योजनेत सहभागासाठी ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन

शासकीय संस्थेची नूतन इमारत म्हणजे मुलांच्या आयुष्यामध्ये पर‍िवर्तन घडवणारी वास्तू – पालकमंत्री नितेश राणे शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे उद्घाटन

शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाच्या इतिहासाचा समावेश करणार; नवी मुंबईत त्यांच्या नावाने रुग्णालय उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत हिंद दि चादर कार्यक्रमाचे खारघरमध्ये भव्य आयोजन

सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त : जालन्यात काँग्रेस पक्षातर्फे आनंदोत्सव साजरा