vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा*

मिशन वात्सल्य अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा*

सातारा प्रतिनिधी- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सातारा व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे संयुक्त विद्यमाने दि. 22 जूलै रोजी पंचायत समिती, सातारा येथे मिशन वात्सल्य अंतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा सुरेखा कोसमकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा यांचे मार्गदर्शनानुसार पार पडलेल्या या कायशाळेस सातारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना नि. बेदरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी साताराचे आनंद खंडागळे, पंचायत समिती, सातारा गटविकास अधिकारी सतीश बुद्दे, अॅड. सुचित्रा घोगरे काटकर, अध्यक्षा बालकल्याण समिती, सातारा, अॅड. योगेंद्र सातपुते, सदस्य माजी बालकल्याण समिती, सातारा उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना नि. बेदरकर यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम २०२२ मधील कलम १३ नुसार मनाई आदेश घेण्याबाबतची भूमिका व प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करुन उपस्थित ग्रामसेवकांच्या समस्यांचे समाधान केले. उपस्थितांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज समजावून सांगण्यात आले. योगेंद्र सातपुते यांनी बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियमन २०१५ या कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. अॅड. सुचित्रा घोगरे-काटकर यांनी बालविवाह विषयी विस्तृत माहिती दिली तसेच गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी ग्रामसेवकांच्यावतीने सातारा तालुका बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संकेत मोरे, केंद्र समन्वयक, चाईल्ड हेल्पलाईन, सातारा यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सुजाता देशमुख, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.

 

00

संबंधित पोस्ट

घरेलू कामगार निरोगी होण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरातून मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील   – घरेलू कामगार आरोग्य तपासणी अभियान उद्घाटन कार्यक्रमात प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांनी वैश्य समाज स्नेहमेळाव्यात-दिली पर्यटन योजनांची सविस्तर माहिती

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून सहा महिन्यात पाच कोटी 92 लाखांची मदत..

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत  ‘श्री राजमातंगी महायज्ञ’१७ मे या दिवशी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या मागील नर्दुल्ला टँक मैदानात दुपारी ३.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत यज्ञसोहळा चे आयोजन

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यशस्वी होण्यासाठी निरंतर वाचन आवश्यक- कुंडलिकराव अतकरे

vishwatmaklokswamivarta