vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   नवी मुंबई महानगरपालिका व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सिडको प्रदर्शनी केंद्र, वाशी येथे सकाळी 6.30 वा. करण्यात आले आहे.

          या विशेष योग कार्यक्रमात नागरिक, विविध शाळा – महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक – प्राध्यापक, महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. योगाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावे तसेच निरोगी जीवन शैलीचा संदेश समाजात रुजावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे क्रीडा समिती सभापती श्री. गिरीश कान्हा म्हात्रे यांनी सांगितले आहे.

          आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग चळवळीला बळ द्यावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे.

          तरी सर्व नागरिकांनी या कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

मुंबईकरांची लाईफ  लाईन बेस्ट वाचवा मुंबई वाचवा आंदोलनाला ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जाती व भटक्या जमाती उमेदवारांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी सातारा शहरात मॉल उभारणार- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

vishwatmaklokswamivarta

युवकांसाठी ‘अमृत चे’ ड्रोन प्रशिक्षण; परवानाही मिळणार खुल्या प्रवर्गाच्या आर्थिक दुर्बल घटकातील युवकांनी अर्ज करावेत

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताची दमदार कामगिरी, पहिल्याच सहभागात पटकावला आठवा क्रमांक

vishwatmaklokswamivarta