vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन..

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला मराठी भाषा सक्ती करण्याचा इशाराही दिला आहे. आणि मराठी भाषेवर सुरू असलेले आंदोलन तूर्तास थांबवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे सूत्रांकडून

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी बँका आणि इतर आस्थापनांमध्ये मराठीत काम करण्याची आणि बोलण्याची चळवळ सुरू केली. या आंदोलनाअंतर्गत राज्यात काही ठिकाणी निदर्शनेही होताना दिसत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये म्हणून, मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून, राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांकडून मराठी भाषेवरून सुरू असलेले आंदोलन थांबवण्यासाठी एक खुले पत्र लिहिले आहे.

सदर पत्रात ,गुढीपाडव्याच्या सभेत मी तुम्हाला आदेश दिले होते की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत का ते पहा आणि जर नसेल तर त्या बँकेच्या प्रशासनाला कळवा. दुसऱ्या दिवसापासून तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये जाऊन मराठीवर भर दिला, ते चांगलेच झाले. यामुळे मराठी भाषा आणि मराठी लोकांना कोणीही हलक्यात घेऊ शकत नाही असा संदेश गेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकदही दूरवर पोहोचली. पण आता हे आंदोलन थांबवण्यात काहीच अडचण नाही, असे या पत्रात नमूद केले असल्याची माहिती आहे

सदर पत्र ट्विटर वर उपलब्ध आहे

संबंधित पोस्ट

चीनची अडवणूक   भक्तांचे व्हिसा रोखले कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पुण्यातील 52 महादेव भक्त नेपाळमध्ये अडकले

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

नववर्षानिमित्त चिखलदरा येथील वनवे वाहतूक व्यवस्था दोन दिवस राहणार*पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta

मुंबई कांदिवली येथील ग्रॉवेल्स १०१ मॉल’  तत्काळ बंद करा;  मुंबई हायकोर्टाचा एमपीसीबीला आदेश

राज्यात नागपूरसह राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भातील काही भागात तीव्र उष्णता कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला