vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

जालना प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत पशुपालकांसाठी विविध योजना महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ५० टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ दुधाळ गाय/म्हशीचे वाटप. ७५ टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ भृनाचे प्रत्यारोपण केलेली सात महिन्याची गाभण कालवड वाटप. २५ टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा. २५ टक्के अनुदानावर फट व एसएनएफ वर्धक खाद्य पुरवठा. ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप. २५ टक्के अनुदानावर मुरघास पुरवठा. १०० टक्के अनुदानावर सावर बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी बियाणे/ठोंबे वाटप. तरी या योजनांचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जालना यांनी केले आहे. तसेच योजनांसंबंधी अधिक माहितीकरीता विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ चे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल जाधव जालना यांना ८६०५४५१८५० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

गुणवत्तापूर्ण सुविधा पूर्ततेप्रमाणेच त्यासाठी कार्यरत कर्मचारीहिताय निर्णयावर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा भर दीड वर्षात 937 अधिकारी-कर्मचारी यांना पदोन्नती, आश्वासित प्रगती, अनुकंपा, लाड-पागे वारसा हक्क लाभ,प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी यांचेमध्ये समाधानाचे वातावरण

vishwatmaklokswamivarta

विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील-घाट परिसरात 25-26 जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज…विदर्भ (प्रामुख्याने पूर्व विदर्भ) आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात धरण साठ्यात वाढ आणि नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे

vishwatmaklokswamivarta

एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हिच ईश्वर सेवा समजून काम करावे..! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार