vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत

सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिला तहसिलनिहाय तर 25 एप्रिल रोजी महिला आरक्षण सोडत

 

बुलढाणा, प्रतिनिधी : ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण निश्चित करायचे आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2025 ते 2030 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण दि. 16 एप्रिल 2025 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 25 एप्रिल रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी याबाबतची सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

धारावीकरांसाठी खुशखबर- सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा #पुनर्विकास करण्यात यावा.- प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन योजनांची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन

पद्मश्री किसनराव बाबुराव हजारे (अण्णा) यांनी राळेगणसिद्धी येथे स्वगणना प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांना सहभागाचे आवाहन केले

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करावी,सांगली पाटबंधारे विभागाची कर्नाटक शासनास विनंती- हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत- अलमट्टी धरणाची पाणीपातळी मर्यादित राखण्याचे आवाहन

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री कु. अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न