vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करावी,सांगली पाटबंधारे विभागाची कर्नाटक शासनास विनंती- हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत- अलमट्टी धरणाची पाणीपातळी मर्यादित राखण्याचे आवाहन

आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करावी,सांगली पाटबंधारे विभागाची कर्नाटक शासनास विनंती- हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत- अलमट्टी धरणाची पाणीपातळी मर्यादित राखण्याचे आवाहन

 

 सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत असून आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. ही माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दि. 20 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजता हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी 522.60 मीटर असून आवक 36,400 क्युसेक्स तर जावक 34,450 क्युसेक्स आहे. बॅरेजमध्ये 3.98 टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी 3.18 टीएमसी उपयुक्त व 0.80 टीएमसी मृत साठा आहे. को. प. बंधारा राजापूर येथील पाणीपातळी 524.483 मीटर असून तेथून 35,208 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सून कालावधीत कृष्णा नदी प्रवाहीत राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत, अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे.

 आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.00 ते 517.50 मीटर दरम्यान राखण्याचीही विनंती करण्यात आली आहे. सध्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.680 मीटर असून धरणात 40,173 क्युसेक्स आवक व 16,458 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गतवर्षांच्या अनुभवावरून जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमानाचे प्रमाण जास्त असते. सन 2026 मध्ये अलनिनोचा प्रभाव सक्रिय झाल्यामुळे काही भागांत दुष्काळ तर काही भागांत अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास कृष्णा नदी प्रवाहीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

 पूर व्यवस्थापनाच्या दृष्टीने आंतरराज्य बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्नाटक शासनाकडून नेहमीप्रमाणे सकारात्मक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.

00000

संबंधित पोस्ट

खारेपाट येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा– पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

डोंगरी भागातील लोकांना विविध ठिकाणच्या संस्कृतींची अनुभूती देणारा कोयना दौलत डोंगरी महोत्सव- पालकमंत्री शंभूराज देसाई

नांदेड जिल्ह्यात खरीपसाठी मुबलक #खत साठा उपलब्ध• शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा-संयुक्त परीक्षा २ फेब्रुवारी रोजी; २०६६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

पाण्याचा पुनर्वापर करीत ‘झिरो डिस्चार्ज’ संकल्पना प्रभावीपणे राबविण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सहेली महिला बचत गटाच्या वतीने पेढे वाटून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी