vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता इलेक्ट्रॉनिक्स वस्तूरिपेअरिंग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता इलेक्ट्रॉनिक्स वस्तूरिपेअरिंग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- कारागृहातील बंदी सुटुन गेल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांचा व त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा याउद्देशाने अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे व विषेश कारागृह महानिरीक्षक, दक्षिण विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांकरीता श्री श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट यांच्यामार्फत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअरिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कारागृहात अलिबाग येथे सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीम. तेजस्विनी निराळे यांच्याहस्ते करण्यात आले.

या प्रशिक्षणाकरीता कारागृहातील 35 बंद्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला असून प्रशिक्षणाचे माध्यमातून एसी, फ्रिज, वाशिंग मशिन, टिव्ही, मिक्सर, ग्रांईडर, गिझर हिटर, ईत्यादी वस्तू ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअरिंगचे प्रशिक्षण बंद्यांना देण्यात येणार आहे. यावेळी बंदी कारागृहातून सुटून गेल्यानंतर या प्रशिक्षणाचा बंद्यांना कशाप्रकारे उपयोग होईल याबाबत सर्व बंद्यांना मार्गदर्शन करुन कारागृहातील जास्तीत जास्त बंद्यांनी या प्रशिक्षणात भाग घेण्याचे आवाहन सचिव, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्रीम. तेजस्विनी निराळे यांनी केले.

या कार्यक्रमाकरीता विशाल बांदल, प्र.अधीक्षक, अलिबाग जिल्हा कारागृह, श्रीम.तृप्ती वटकर व प्रशिक्षक येवले, श्री श्री रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम ट्रस्ट तसेच अॅड चंद्रशेखर कामथे, मुख्य लोकअभिरक्षक, अॅड. निलोफर शेख, अॅड. पियुष गाडे, सहाय्यक लोक अभिरक्षक, श्रीम.नितल म्हात्रे, लिपिक जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, अलिबाग-रायगड, श्री. वारगे, तु अ.श्रेणी-2, श्री. कुटे, सुभेदार व श्री. ठोंबरे व श्री. तारमळे, हवालदार तसेच नरसु कोळी, का. शिपाई इत्यादी उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

वसतिगृह प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी आधार, स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन; ऑनलाईन अर्ज 18 सप्टेंबरपर्यंत मागविले

खरीप हंगामात ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर व औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान

vishwatmaklokswamivarta