vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांगांची क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत   – जिल्हाधिकारी अशोक काकडे- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…

दिव्यांगांची क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत   – जिल्हाधिकारी अशोक काकडे- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात…

 

 सांगली, प्रतिनिधी : दिव्यांग मुलांमध्ये खूप कलात्मकता आहे, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तीमधील कमतरता न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमता पाहून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.

 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित दिव्यांगांच्या विशेष शाळा / कर्मशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल, माधवनगर रोड सांगली येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती सुनंदा ठवळे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप कोटकर, एसईडीबी, मुंबईचे संस्थापक जमीर ढाले, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून कौशल्य प्रशिक्षणातून त्यांना स्वावलंबी बनविणे आवश्यक आहे. यामधून त्यांच्या आई-वडिलांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. यामध्ये दिव्यांग शाळेतील शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असून यासाठी शिक्षकांनी जबाबदारी उचलावी. प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. फक्त मनामध्ये जिद्द असावी लागते. आयुष्यात उद्दिष्ट ठरवून लक्ष केंद्रित करा, नक्की चांगले यश मिळेल, असे सांगून त्यांनी दिव्यांग विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. दिव्यांग विद्यार्थ्यांची कायम प्रगती व्हावी, ते सक्षम व्हावेत आणि त्यांना आयुष्यामध्ये उभे राहण्यासाठी जे काही लागत असेल, ते देण्याचा आम्ही सर्वजण नक्कीच प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी आश्वासित केले.

 यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात आलेल्या रोबोटिक्स प्रशिक्षण, दिव्यांग मुलांनी बनवलेल्या वस्तुंचे विक्री व प्रदर्शन, UDID तपासणी व वितरण शिबिरे आदि उपक्रमांची माहिती देवून यापुढेही दिव्यांग सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.

 प्रास्ताविकात दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी महेश धोत्रे यांनी दिव्यांग व्यक्तींकरिता असणारे कायदे व योजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा स्तरावर करणार असल्याचे नमूद केले. सहाय्यक सल्लागार श्रीमती मंजिरी जाधव यांनी आभार मानले.

 यावेळी दिव्यांगत्वावर मात करून यश संपादन केलेल्या दिव्यांग व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद सांगली व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा सांगली यांच्या अधिनस्त सांगली जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या विशेष शाळा /कर्मशाळामधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी एकूण ३७ विशेष शाळा/कर्मशाळा सहभागी झाल्या. या कार्यक्रमासाठी ८०० विद्यार्थी, दिव्यांग मुलांचे पालक, विविध संघटना, संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी समाजामध्ये दिव्यांगांप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रभात फेरी काढण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

गणेश उत्सवासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण जिल्ह्यात 1 लाख 2 हजार 198 खासगी तर 286 सार्वजनिक मंडळाचे गणपती उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्क…

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

आयुष्यभर झिजलेल्या लेखणीचा ऐतिहासिकसन्मान..!बुलढाण्यात ’पत्रयोगी जीवनगौरव’ पुरस्कार ठरला भावस्पर्शी-केंद्रीय आणि राज्याचे मंत्रीसह जिल्ह्यातील आमदारांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार*

आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक वुईके यांच्याहस्ते वनहक्क पट्टे वाटप