vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान,उदगीर नगरपरिषद निवडणुकीत 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसा नगरपरिषदमध्ये 75.73 टक्के मतदान…

लातूर जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांसाठी शांततेत मतदान,उदगीर नगरपरिषद निवडणुकीत 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसा नगरपरिषदमध्ये 75.73 टक्के मतदान…

लातूर प्रतिनिधी-जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांमध्ये आज (ता. 02) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झाले. सर्वच मतदान केंद्रावर शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये उदगीरमध्ये 68.12 टक्के, अहमदपूरमध्ये 73.06 आणि औसामध्ये 75.73 टक्के मतदारांनी आपला हक्क बजाविला.

उदगीर नगरपरिषदेसाठी 91 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण 83 हजार 179 मतदारांपैकी 29 हजार 423 पुरुष, 27 हजार 231 महिला व 9 इतर मतदार असे एकूण 56 हजार 663 मतदारांनी मतदान केले.

अहमदपूर येथे सर्व 44 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. शहरातील 37 हजार 696 मतदारांपैकी 27 हजार 540 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. यामध्ये 14 हजार 242 पुरुष आणि 13 हजार 298 महिला मतदारांचा समावेश आहे.

औसा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 36 मतदान केंद्रांवर एकूण 75.73 टक्के मतदान झाले. 32 हजार 320 एकूण मतदारांपैकी 24 हजार 476 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 12 हजार 870 पुरुष आणि 11 हजार 606 महिला मतदारांचा समावेश आहे.

*****

संबंधित पोस्ट

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….

तयारी नरनाळा महोत्सवाची; दरपत्रके मागवली

vishwatmaklokswamivarta

अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

निसर्गोपचारआश्रम चा ८१ वा स्थापना दिवस उत्साहात पार पडला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित

हरित सातारा उपक्रम दरवर्षी राबवणार*   *- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले*