vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारणा धरणात 34.21 टी.एम.सी. पाणीसाठा

वारणा धरणात 34.21 टी.एम.सी. पाणीसाठा

      सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.21 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

  विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 103.73 (105.25), धोम 13.43 (13.50), कन्हेर 9.90 (10.10), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.82 (9.97), तारळी 5.85 (5.85), वारणा 34.21 (34.40), राधानगरी 8.17 (8.36), दूधगंगा 21.87 (25.40), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.77 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), अलमट्टी 122.13 (123).

 सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून आज सकाळी 8 वाजता सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे – कोयना 20366, धोम 193, कण्हेर 40, धोम बलकवडी 906, तारळी 350, राधानगरी 250, दुधगंगा 1100, तुळशी 50, कासारी 300, पाटगाव 1034, हिप्परगी बॅरेज 83 हजार 304 व अलमट्टी धरणातून 1 लाख 20 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे

 विविध पुलाच्या ठिकाणी आज सकाळी 8 वाजेपर्यंतची पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 20 (40) व अंकली पूल हरिपूर 21.9 (45.11).

00000

संबंधित पोस्ट

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी शेख महेमूद यांंची निवडअरविंद अण्णा चव्हाण यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया : कागदपत्र पडताळणी व प्रवेशासाठी अंतिम मुदतवाढ

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यंत्रणांच्या कामकाजाचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा..- 31 ऑक्टोबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घेण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta