vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

     जालना, प्रतिनिधी: पोलीस पाटील भरती 2025 करीता आज पार पडलेल्या परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट देवून, परीक्षा पारदर्शक व्हावी आणि गैरप्रकार होऊ नये याची पाहणी करून, परीक्षा सुरळीत पार पडेल याची खात्री केली. तसेच परीक्षेच्या तयारीचा आणि व्यवस्थेचा देखील यावेळी आढावा घेतला.

जालना जिल्ह्यातील पोलीस पाटील संवर्गाची पदभरतीसाठी जिल्ह्यातील जालना उपविभाग 185, भोकरदन उपविभाग 242, अंबड उपविभाग 251 आणि परतूर उपविभाग 204 असे एकूण 724 रिक्त पदासाठी आज एकुण 24 परिक्षा केंद्रावर लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. आज पार पडलेल्या पोलीस पाटील भरती परीक्षेला 7843 परिक्षार्थींनी परीक्षा दिली. जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी येथील अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना आणि डॉ. बद्रीनारायण बारवाले, महाविद्यालय, जालना या परिक्षा केंद्रास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली.

पोलीस पाटील भरती 2025 ही अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने यशस्वीरित्या पार पडावी याकरीता सर्व परिक्षा केंद्रावर बैठे पथक व भरारी पथक यांची नियुक्त करण्यात आले होते. या भरती प्रक्रियेमध्ये सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कर्मचारी, पोलीस यंत्रणा व तांत्रिक पथक यांनी उत्कृष्ट समन्वय व कार्यक्षमता दाखवत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळे सर्व परिक्षा केंद्रावर शांततापुर्ण वातावरणात परिक्षा पार पडली. कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा9 ऑक्टोबरपर्यंत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

vishwatmaklokswamivarta

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

गडचिरोलीत ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रम सुरू होणार – महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील देवनारमध्ये अमली पदार्थांचा मोठा पर्दाफाश: दोन दिवसांत ₹19.78 लाख किमतीचा 94.494 किलो गांजा जप्त

vishwatmaklokswamivarta