vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम-विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा..

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम-विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा..

बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागातर्फे सर्व आगारांमधून पर्यटकांसाठी विशेष पॅकेज टुर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या टुर्सचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक तसेच विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे.

या पॅकेज टुर्स अंतर्गत एक दिवसापासून ते तीन दिवसांपर्यंतच्या देवदर्शन आणि पर्यटनस्थळांच्या भेटीचा समावेश आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार ग्रुप बुकींगद्वारे ही सेवा राबविण्यात येणार असून, सर्व आगारांमधून नियोजित स्थळांकरिता वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.

एक दिवसांचे पॅकेज टुर्स : अजिंठा लेणी-वेरुळ घृष्णेश्वर-खुलताबाद-परत, शेगाव-चिखलदरा-परत, पैठण-परत.

दोन ते तीन दिवसचे पॅकेज टुर्स: कपीलधार-तुळजापूर-अक्कलकोट-पंढरपूर-परत, आळंदी-देहू-भिमाशंकर-परत, शिर्डी-शनिशिंगणापूर-देवगड-परत, औंढा नागनाथ-परळी वैजनाथ-परत, नाशिक-वणी सप्तशृंगी-त्र्यंबकेश्वर-परत, मुक्ताईनगर-चांगदेव-इच्छापूर-अंमळनेर-परत.

याशिवाय प्रवाशांच्या विशेष मागणीनुसार मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर व उज्जैन या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांसाठी देखील वाहतूक सेवा पुरविण्यात येईल. या पॅकेज टुर्सची माहिती, शुल्क, प्रवासाचे वेळापत्रक, बुकिंग प्रक्रिया इत्यादी तपशीलासाठी आपल्या नजीकच्या एस. टी. आगारास भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा ३चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरूप्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान 

कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा सपत्नीक गौरव करुन पुरस्कार..

vishwatmaklokswamivarta

स्टेप’ उपक्रमातील शॉर्ट टर्म कोर्सेससाठी नियमित आयटीआय अभ्यासक्रमाचा निधी वापरलेला नाही– कैशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन-महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

थकीत पाणी देयक रक्कमेवरील विलंब शुल्क व दंडात्मक रक्कमेवर 50 टक्के सवलतीची अभय योजना जाहीर…