vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्टेप’ उपक्रमातील शॉर्ट टर्म कोर्सेससाठी नियमित आयटीआय अभ्यासक्रमाचा निधी वापरलेला नाही– कैशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा

स्टेप’ उपक्रमातील शॉर्ट टर्म कोर्सेससाठी नियमित आयटीआय अभ्यासक्रमाचा निधी वापरलेला नाही– कैशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा

 

          मुंबई, प्रतिनिधी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ‘स्टेप’ (STEP) उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या शॉर्ट टर्म व ॲडव्हान्स कोर्सेससाठी नियमित आयटीआय अभ्यासक्रमाचा निधी वापरण्यात आलेला नसून, त्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे नियमित अभ्यासक्रमावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत सांगितले.

   सदस्य संजय खोडके यांनी ‘स्टेप’ उपक्रमातील कथित अनियमिततेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते.

     मंत्री लोढा म्हणाले की, बदलत्या काळानुसार अल्पकालीन व प्रगत कौशल्य प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉलिड, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रिकल फिटिंग आदी विषयांतील शॉर्ट टर्म आणि ॲडव्हान्स कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. हे कोर्सेस स्वतंत्र निधीतून राबविण्यात आले असून, नियमित आयटीआय अभ्यासक्रमाच्या निधीतून एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही.      राज्यात गेल्या तीन वर्षांत आयटीआयमध्ये विविध नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आले असून, त्याचा सकारात्मक परिणाम प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. यंदा आयटीआयमधील प्रवेशाचे प्रमाण सुमारे ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.

     आयटीआयमधील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसल्यामुळे खोट्या नोंदी करून आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती मंत्री लोढा यांनी दिली.

 

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिशिबीर

vishwatmaklokswamivarta

कायदेशीर जनजागृतीबाबत सातारा शहरात शालेय मुलांची रॅली

vishwatmaklokswamivarta

बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी

कृषी दिनानिमित्त प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव; 22 शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान

महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड· जिल्हा परिषद ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वॉकेथॉन

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण