vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात 28 जून रोजी शिक्षक पात्रता (MAHA-TET) परीक्षा

जिल्ह्यात 28 जून रोजी शिक्षक पात्रता (MAHA-TET) परीक्षा

            रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)-2026 चे आयोजन रविवार, दि. 28 जून रोजी करण्यात आले असून जिल्ह्यात एकूण 9 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. जिल्ह्यात पेपर-1 साठी 4 हजार 432 आणि पेपर-2 साठी 5 हजार 771 असे एकूण 10 हजार 203 उमेदवार परीक्षा देणार आहेत.

परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक पडताळणी, फेस रेकग्निशन, हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित देखरेख व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई करण्यात आली आहे. पेपर-1 साठी सकाळी 8.30 वाजेपर्यंत तर पेपर-2 साठी दुपारी 12.30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नपत्रिकांवर युनिक नंबर व क्यूआर कोड असणार असून उत्तरपत्रिकेसोबत कार्बन प्रती देण्यात येणार आहेत. तसेच संचालक, सहसंचालक व उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची भरारी पथके प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करण्यात आली आहेत.

दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची सुविधा उपलब्ध असून त्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. परीक्षेसंदर्भातील माहिती व सूचनांसाठी उमेदवारांनी केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळांवरील माहितीलाच प्राधान्य द्यावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

प्रशासकीय यंत्रणांद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  अत्याचार प्रतिबंध अधिनियमाची  प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

महाड येथील अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे