vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विधान परिषद प्रश्नोत्तरे-नदी किनारी पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईनबाबत पुन्हा सर्वेक्षण- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील नद्यांच्या किनारी असलेल्या पूर रेषेसंदर्भात असलेल्या ब्ल्यू लाईन बाबत महसूल आणि जलसंपदा विभागामार्फत पुन्हा सर्वेक्षण केले जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य ॲड. अनिल परब यांनी बदलापूर जवळील उल्हास नदी पात्रात होत असलेल्या अतिक्रमणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, सतेज पाटील, डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, नदी किनारी असलेल्या क्षेत्रातील माती उत्खनन करुन उल्हास नदीपात्रात टाकत असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने गौण खनिजासाठी आणि वापरण्यात आलेल्या यंत्रसामग्रीसाठी एकूण १० कोटी १६ लाख १७ हजार १४१ एवढ्या दंडात्मक रकमेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये वापरण्यात आलेली यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. हा दंड वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दहिसर येथे गणपत पाटील नगर परिसरात भराव टाकला जात असल्याबाबतच्या एका उपप्रश्नाच्या उत्तरात येथे तीन दिवसात महसूल विभागाचे अधिकारी जाऊन चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करतील, असे मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोकण विभागातील समुद्र किनारा आणि नदी किनारी महसुली जागेवर अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण काढण्याची कार्यवाही सुरू असून अतिक्रमण केलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta

सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हवाई प्रवास शुल्क विषयक घेतला आढावा

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वतीने शिस्तबद्ध आणि सन्मानपूर्वक तिकीट तपासणीची नवी परिभाषा रचण्याच्या उद्देशाने नमस्ते अभियानाचा प्रारंभ

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना

नवी मुंबई महानगरपालिकेचे 366.80 कोटींचे विक्रमी करसंकलन ! कर संकलनात योगदान देणाऱ्या करदात्यांचे महापालिकेकडून आभार; 1 जुलैपासून विलंब दंड लागू!

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नवीन डब्ब्यांचे पंधरा ऑक्टोबरला अनावरण.

vishwatmaklokswamivarta