vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

बदनापूर, (प्रतिनिधी)-बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट व लायन्स नेत्र रुग्णालय चिकलठाणा यांच्या संयुक्त अध्यक्ष डॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनखाली डोनगाव येथे मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले असून याशिबिरात २६१रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.त्यातील ४६ रुग्णांना मोतीबिंदू निदान झाले आले असून त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली. या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत असून रुग्णांचा जाण्या -येण्याचा खर्च देखील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने डॉ. देवेश पाथ्रीकर हे करतात. निर्मल क्रीडा व समाज,प्रबोधन ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन लायन्स नेत्र रुग्णालय चिकलठाणा यांच्या संयुक्त विद्यमाने गावा-गावात घेण्यात येते.न्यू लाईफ केअर रूग्णालय पाथ्रीकर कॅम्पसचे वैद्यकीय पथकही या वेळीउपस्थित राहून रूग्णांची मोफत तपासणी व मार्गदर्शन करतात. या उपक्रमांतर्गत जाप्रबाद तालुक्यातील डोनगाव येथे संस्थेचे अध्यक्षडॉ.देवेश पाथ्रीकर यांच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.यावेळी २६१ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आले तर४६ रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आल्याने या रुग्णांची शस्त्रक्रियाकरण्यासाठी तारीख देण्यात आले असून रुग्णांची जाण्या -येण्याची तसेचजेवणाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात येते. या शिबीराचा डोनगाव वआसपासच्या गावातील रूग्णांनी लाभ घेऊन पाथ्रीकर कॅम्पसच्या या उपक्रमाबाबत आभार व्यक्त केले.

००००फोटो ओळी…..३-बदनापूर येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीने डोनगावयेथे मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले असूनयाशिबिरात २६१ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.०००००००००००००००००

संबंधित पोस्ट

सातारच्या ऐतिहासिक भूमीत अक्षरांचा जागर ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ ग्रंथदिंडीने जागवल्या पारंपारिक आठवणी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डिजिटल शिक्षण काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्जत – जामखेडमधील १४० शाळांमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण,सभापती प्रा. राम शिंदे यांचा पुढाकार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावेत..

vishwatmaklokswamivarta

शेतमालाच्या बाजारमूल्य निश्च‍ितीमुळे शेतकऱ्यांना मिळणार अधिक फायदास्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी..

माणगांव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” उत्साहात  संपन्न२,७४८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ, अनाथ लाभार्थ्यांत पोलीस शिपाई पदीनिवड झालेल्या युवकाचा विशेष सन्मान !

vishwatmaklokswamivarta