vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी वैभवराजे मोहिते सिद्धेश्वर पवारही नवीन जिल्हाध्यक्ष

व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी वैभवराजे मोहिते सिद्धेश्वर पवारही नवीन जिल्हाध्यक्ष

बुलढाणा, (प्रतिनिधी)-पत्रकारांची जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी दोन अनुभवी पत्रकारांची निवड करण्यात आली आहे. ‘पुण्यनगरी’चे उपसंपादक वैभवराजे मोहिते आणि ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार हे दोघेही संयुक्तपणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत

व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन सध्या पंढरपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी या महत्त्वाच्या निवडीची घोषणा केली. संघटनेच्या नव्या कार्यरचनेनुसार बुलढाणा जिल्ह्याला पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष मिळाले आहेत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात संघटनेच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.

दोन दिवसांपूर्वीच मावळते जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी बुलढाणा जिल्ह्यात दोन जिल्हाध्यक्ष असतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांचे लक्ष लागले होते. पंढरपूर येथील राज्य अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही उत्सुकता संपुष्टात आली आणि सर्वानुमते वैभवराजे मोहिते आणि सिद्धेश्वर पवार यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले.

संघटनेत उत्साहाचे वातावरण,वैभवराजे मोहिते हे ‘पुण्यनगरी’चे उपसंपादक असून, सिद्धेश्वर पवार हे देखील एक वरिष्ठ पत्रकार आहेत. या दोन अनुभवी नेत्यांच्या हाती जिल्हाध्यक्षपदाची धुरा आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सदस्यांमध्ये आणि पत्रकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आणि संघटनेचे काम अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करावापाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश…

जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुक; अंतिम प्रभाग रचना जाहीर

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.

vishwatmaklokswamivarta

गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ