vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान 

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिल रोजी मतदान

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक रविवार, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार असून जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले.

या निवडणुकीसाठी राज्यभरातून एकूण ६० उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी ९ सदस्य निवडले जाणार आहेत. मतदार म्हणून परिषदेकडे नोंदणीकृत आधुनिक वैद्यकीय व्यवसायिकांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून एकूण मतदार संख्या २ हजार ९१६ इतकी आहे. मतदारांच्या ओळख पटविण्यासाठी परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र, छायाचित्र नसल्यास अन्य फोटो ओळखपत्र, परिषदेकडून दिलेले ओळखपत्र व भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली छायाचित्र असलेली सर्व ओळखपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. ओळखीचा पुराव्यांची मूळ प्रत आवश्यक आहे. छायाकिंत व मोबाईलमधील प्रत ग्राह्य धरली जाणार नाही. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल नेता येणार नाही.

अहिल्यानगर शहरातील डॉ. ना. ज. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ४ मतदान केंद्रे व डॉ. ना. ज. पाटील फार्मसी कॉलेज, वसंत टेकडी, सावेडी येथे १ असे एकूण ५ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १ क्षेत्रीय अधिकारी, वर्ग २ दर्जाचे ६ मतदान केंद्राध्यक्ष व वर्ग ३ संवर्गातील २४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

निवडणुकीसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत पात्र मतदारांनी निर्धारित वेळेत मतदान करून आपला हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

इलेक्ट्रिक वाहन रॅली उद्या (दि.२९):प्रदूषणमुक्त भविष्यासाठी पुढाकार

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास,सुधारित प्रस्ताव सादर करावाकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश१४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिस्याची रक्कम वितरित करण्याबाबत,कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विनंती केली

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन,नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही…

vishwatmaklokswamivarta

मंदिर संस्कृतीच्या संरक्षणासाठी बेंगळुरूमध्ये कर्नाटक राज्यातील दुसर्‍या मंदिर अधिवेशनाचा प्रारंभ,आता लढा मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा – पू. देवकीनंदन ठाकूर

पंचायत समिती कल्याण येथे कीटकनाशके हाताळणी, साठवणूक व फवारणीसाठी शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणारअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

vishwatmaklokswamivarta