vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मंदिर संस्कृतीच्या संरक्षणासाठी बेंगळुरूमध्ये कर्नाटक राज्यातील दुसर्‍या मंदिर अधिवेशनाचा प्रारंभ,आता लढा मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा – पू. देवकीनंदन ठाकूर

मंदिर संस्कृतीच्या संरक्षणासाठी बेंगळुरूमध्ये कर्नाटक राज्यातील दुसर्‍या मंदिर अधिवेशनाचा प्रारंभ,आता लढा मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीचा – पू. देवकीनंदन ठाकूर

 

       बेंगळुरू प्रतिनिधी: अयोध्येत श्रीराम मंदिर बनले. जय श्रीराम पूर्ण झाले. आता तुम्ही (हिंदू) मथुरेला येणार कि नाही ? मथुरेत जन्मभूमी बनवायची आहे कि नाही ? ‘बहुत सह लिया, अब ना सहेंगे; हिंदू हक अब लेकर रहेंगे !’ या प्रभावी घोषणेने प्रसिद्ध कथावाचक पू. देवकीनंदन ठाकूर मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंना पुढे येण्याचे आवाहन केले. कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे ‘कर्नाटक मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने आयोजित द्वितीय ‘कर्नाटक मंदिर अधिवेशन’त ते बोलत होते. या वेळी राज्यभरातील मंदिर विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित आणि मंदिर संरक्षणासाठी लढणारे अधिवक्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी पू. देवकीनंदन ठाकूर पुढे म्हणाले की, जसे मुसलमानांचे धार्मिक स्थळांच्या रक्षणासाठी वक्फ बोर्ड आहे, तसे हिंदूंची मंदिरे मुक्त करून त्यांच्या व्यवस्थापनासाठी ‘सनातन बोर्ड’ बनवणे आवश्यक आहे. संस्कृतीचे संरक्षण हवे असेल, तर मंदिरांचे रक्षण आवश्यक आहे आणि हे केवळ हिंदू एकत्र आल्यास शक्य आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांना मंदिर संरक्षणासाठी लढा देण्याचे आवाहन केले.

    कर्नाटक राज्यातील ‘गंगम्मा तिम्मय्या कन्व्हेन्शन हॉल’, बसवेश्वरनगर, बेंगळुरूमध्ये मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी मंदिर विश्वस्तांच्या मंदिर अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने झाला. या वेळी पू. रामानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था; ज्येष्ठ अधिवक्ता प्रमिला नेसरगी, कर्नाटक उच्च न्यायालय; श्री. नंदकुमार आयएएस, माजी आयुक्त, मुजराई विभाग, कर्नाटक सरकार; पद्मश्री श्री. आर. व्ही. गौरीशंकर, माजी प्रशासकीय अधिकारी, श्रृंगेरी महासंस्थान आणि श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, मंदिर महासंघ यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ‘रुग्णाची सेवाशुश्रूषा साधना म्हणून कशी करावी ?’ या सनातननिर्मित कन्नड भाषेतील लघुग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

 भारतभर मंदिर महासंघाच्या कार्याला हिंदू समाजाकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. कर्नाटक राज्यातील मंदिरांच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी हिंदूंनी एकत्र यावे, असे आवाहन कर्नाटक मंदिर महासंघाचे संघटक श्री. मोहन गौडा यांनी केले.श्री. मोहन गौडा,राज्य संघटक, कर्नाटक मंदिर महासंघ

[ व्यासपीठावर दीपप्रज्वलन करतांना डावीकडून अधिवक्ता प्रमिला नेसरगी, वरिष्ठ अधिवक्ता, कर्नाटक उच्च न्यायालय, श्री नंदकुमार आईएएस, पूर्व आयुक्त, मुजराई विभाग- कर्नाटक सरकार, पद्म श्री श्री. आर.वी. गौरीशंकर, पूर्व प्रशासक, श्रृंगेरी महसंस्थान, पूज्य देवकीनंदन ठाकुर जी, संस्थापक, विश्व शांति सेवा ट्रस्ट, पूज्य रमानंद गौड़ा, धर्मप्रचारक संत, सनातन संस्थागोविंद बाबू पुजारी, प्रबंध निदेशक, वरलक्ष्मी चैरिटेबल ट्रस्ट, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक श्री सुनील घनवट]

संबंधित पोस्ट

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत;**पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश*

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार असून बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप- जिल्ह्यात 657 उमेदवारांची नियुक्ती

भारतीय नेमबाज अनिश भानवळा यांनी काहिरो, इजिप्त येथे झालेल्या ISSF वर्ल्ड शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. 🇮🇳🏆

vishwatmaklokswamivarta

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५,४६,०१० अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा..

vishwatmaklokswamivarta