vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फुले दाप्त्यांना अपेक्षित मानवसेवा पैकी एक निराधार वृद्धांची सेवा होय-प्रताप भांबळे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य कोठी भेट…

फुले दाप्त्यांना अपेक्षित मानवसेवा पैकी एक निराधार वृद्धांची सेवा होय-प्रताप भांबळे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त धान्य कोठी भेट…

चिखली – प्रतिनिधी: ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. येथे असलेल्या निराधार वृद्धाना चांगल्या प्रकारचे भोजन, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक सेवा देऊन मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे असे तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील निराधार वृद्धाच्या सेवे करिता धान्य साठविण्यासाठी 6 क्विंटल धान्य बसेल येव्हडी धान्य कोठी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रताप भांबळे अध्यक्ष संत कबीर पत संस्था चिखली यांनी भेट दिली.

यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष गजानन फोलाने सरपंच भोकर, प्रमुख मार्गदर्शक प्रताप भांबळे अध्यक्ष संत कबीर सहकारी पत संस्था चिखली तर प्रमुख उपस्थितीत मनोहर डोंगरदिवे, सामाजिक कार्यकर्ते, सौं वनिता ताई भांबळे, श्रेया ताई भांबळे, डॉ ऋषिकेश भांबळे हे होते.

सावित्री माई मुळे आज मुली मुल शिक्षण घेत आहे तर मी सुद्धा आज शिकून शिक्षक झालो हि देण सुद्धा त्यांचीच आहे. फुले दाप्त्यांना मानवसेवा अपेक्षित होती आज सर्व आपल्या परीने लोक कार्य करीत आहे. त्यांना अपेक्षित कार्या पैकी एक मानवसेवा म्हणजे निराधार वृद्धांची सेवा करणे होय असे प्रतिपादन प्रताप भांबळे यांनी व्यक्त केले.

यावेळी सर्व मान्यवरांचे समोयोचित मार्गदर्शन झाले. यावेळी संयम्य गवई, साहिल गवई, राजू डोंगरदिवे, अवचित डोंगरदिवे, कांताबाई डोंगरदिवे, निलेश डोंगरदिवे यांनी परिश्रम घेतले.

भांबळे परिवाराने धान्य कोठी वृद्धाश्रमाला भेट दिल्याबद्दल संचालक व संचालिका यांनी आभार व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कायद्याचा धाक निर्माण करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

भूकंपविषयक आपत्ती व्यवस्थापनाची १७ फेब्रुवारी रोजी रंगीत तालीम; नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक राहणार उपस्थित

vishwatmaklokswamivarta

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 30 प्रकरणांना मंजुरी

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न