vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा ३चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरूप्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

विधानपरिषद कामकाज बातमी अर्धातास चर्चा ३चंद्रपूर प्रदूषण प्रश्नावर उपाययोजना सुरूप्रदूषण नियंत्रणासाठी सरकार कटिबद्ध- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, प्रतिनिधी : चंद्रपूर परिसरातील औष्णिक विद्युत केंद्र, कोळसा खाणी व स्टील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नावर शासन जागरूक असून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.अर्धातास चर्चेदरम्यान उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुंडे बोलत होत्या.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, चंद्रपूर परिसर 2010 मध्ये “क्रिटिकली पॉल्युटेड एरिया” (CPA) म्हणून नोंदवलेला होता, मात्र विविध उपायांमुळे प्रदूषण निर्देशांक 83 वरून 54 वर आला आहे. यामुळे काही उद्योगांना अटींवर परवानग्या देण्यात आल्या आहेत. प्रदूषण नियंत्रणासाठी उद्योगांना ईएसपी (इलेक्ट्रोस्टॅटिक प्रिसिपिटेटर), डस्ट कलेक्टर, ऑनलाइन मॉनिटरिंग सिस्टीम, जलप्रदूषण नियंत्रणासाठी ट्रीटमेंट प्लांट, पाण्याचा पुनर्वापर, रस्त्यांचे पक्कीकरण व फवारणीसारख्या अटी बंधनकारक करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासन वेळोवेळी उद्योगांना नोटिसा देऊन तपासणी करीत आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रदूषण नियंत्रणासाठी निधीही वितरित करण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी निधी खर्चात अंमलबजावणी कमी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. चंद्रपूरसारख्या प्रदूषण क्लस्टर असलेल्या भागासाठी स्वतंत्र प्रदूषण नियंत्रण आराखडा तयार करण्याची सरकारची सकारात्मक भूमिका असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

मुंबई शहर जिल्ह्यासाठी ८१३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंत्रणांनी समन्वयातून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत

vishwatmaklokswamivarta

शिवकालीन वारसा पर्यटनाला मिळणार नवी ओळख**किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार* *प्रथम टप्प्यात १ कोटींचा निधी – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई*

सहेली महिला बचत गटाच्या वतीने पेढे वाटून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थकुंभमेळा २०२७ चे आयोजन-कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे. त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाज्योती’च्या स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसादओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी,विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकला रामकाल पथाचे भूमिपूजन…

vishwatmaklokswamivarta