vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषी पंप देण्याचा शासनाचा विचार- ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी:- राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप देणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी पारंपरिक कृषी पंप देण्याबाबत शासन विचार करेल. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली.

विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आलेल्या सीआरआय कंपनीच्या सोलार पंपाच्या तक्रारीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनीही सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत देशातील ५० टक्के वीज अपारंपरिक स्त्रोतांतून निर्मित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्याला अनुसरून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातही सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिले असून मागेल त्याला सौर पंप देण्याची योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे सौर पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यात सी.आर.आय. कंपनीमार्फत लावण्यात आलेल्या सौर कृषी पंपांबाबत आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कंपनीला १३ लाखाचा दंडही करण्यात आला असल्याचेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी यावेळी सांगितले. या कंपनीच्या सौर कृषी पंपांबाबत १८३ शेतकऱ्यांनी ५४४ तक्रारी नोंदवल्या होत्या. यातील ५४२ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, उर्वरित दोन तक्रारी पाण्याचा स्त्रोत कोरडा झाल्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. जिथे पाण्याची पातळी खालावली आहे, अशा ठिकाणी बुस्टर पंप बसवून नदी किंवा जलस्रोतांमधून शेतापर्यंत पाणी पोचविण्यात येत आहे, असेही राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा..

vishwatmaklokswamivarta

लोकल अपघातानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार दिवा-CSMT जलद लोकल सुरू करण्याची रेल्वेकडे मागणी, गर्दी कमी करण्यासाठी लोकल फेऱ्या वाढवण्यावर भर. “नवीन मार्गिका, १५ डब्यांच्या लोकल्स आणि जलद सेवा गरजेच्या!”

गोठ्यात आता कालवडींचे प्रमाण वाढणार  सेक्स सॉर्टेड सिमेनसाठी नियोजनमधून एक कोटीचा निधी मंजूर- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार- जिल्ह्यात सध्या 17 हजार 391 सिमेन डोस उपलब्ध

बाल शक्ती पुरस्कार; ऑनलाईन अर्ज आमंत्रित

नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन ९६५ पदनिर्मितीसह ३,९५२ पदे मंजूर-नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे विभागाच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मंजुरी…

vishwatmaklokswamivarta

मोदी सरकारचा 2025 अर्थसंकल्प शेतकरी, महीला, युवा, कामगार, उद्योजकांना उन्नती देणारे व सर्वसामान्य मध्यवर्गीयांना दिलासा देणारे – रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta