vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा; संयुक्त मुख्यपरीक्षा रविवारी (दि.२९)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा; संयुक्त मुख्यपरीक्षा रविवारी (दि.२९)

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी– महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचे मार्फत आयोजीत, महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा-२०२४ रविवार दि. २९ रोजी होणार आहे. ही परीक्षा सकाळी ११ ते १२ व दुपारी ३ ते ४वाजेपर्यंत अशा दोन सत्रात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्हाकेंद्रावर एकूण ४ केंद्रांवर ९८४ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.परीक्षेसाठी एकूण १२८ अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगिता राठोड यांनी कळविले आहे.

परीक्षा केंद्रांची यादी याप्रमाणे-१. विवेकानंद कला व सरदार दिलिपसिंह वाणिज्य महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर -(२४० उमेदवार)२. विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर -(२४०उमेदवार )३. शासकीय तंत्रनिकेतन,महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर-(२८८ उमेदवार )४. शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदारी गेस्ट हाऊस जवळ विश्वास नगर, छत्रपती संभाजीनगर-(२१६उमेदवार)

परिक्षार्थींसाठी सुचनाः१. परिक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्‍या पुराव्‍यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड इत्यादी प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मुळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.२. परिक्षेच्या वेळी कक्षात प्रवेशप्रमाणपत्र, काळ्या व निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, ओळखपत्र व ओळखपत्राची छायांकीत प्रत या व्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य अथवा वस्तु परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास उमेदवारास परवानगी असणार नाही.३. उमेदवारास त्याच्यासोबत डिजीटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्लुटुथ, कॅमेरा,फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणले तर उमेदवारांना स्वत:च्या जबाबदारीवर परीक्षा केद्रांच्या आवाराच्या मुख्य दरवाजाबाहेरच ठेवावे लागेल. तसेच असे साहित्य ठेवण्याची जबाबदारी आयोगाची असणार नाही. परीक्षा केंद्राच्या आवाराच्या मुख्य दरवाजाच्या आत असे साहित्य आणल्यास उमेदवारांवर फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह त्यांना आयोगाच्या आगामी परिक्षांकरिता बंदी घालण्यात येईल

४.सुधारीत कार्यपद्धतीनूसार प्रत्‍यक्ष परीक्षा सुरू होण्‍याच्‍या दीड तास अगोदर उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊन अर्धा तास अगोदर परीक्षा इमारतीचे मुख्यद्वार बंद करण्यात येणार आहे.५.परीक्षा कक्षात शेवटच्‍या प्रवेशासाठी निर्धारीत केलेल्‍या वेळेनंतर आलेल्‍या उमेदवारास कोणत्‍याही परिस्थितीत परीक्षेसाठी प्रवेश देण्‍यात येणार नाही.६.परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरिता जिल्हाधिकारी स्वत: लक्ष ठेवणार आहेत

०००००

संबंधित पोस्ट

जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत 436 कोटी नियतव्यय मंजूर

vishwatmaklokswamivarta

गोंदिया जिल्ह्यातील वीजप्रश्न लवकरच मार्गी लागणार   – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे–मुंबई एक्सप्रेस वे’ वरील अपघातामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होणार

vishwatmaklokswamivarta

योगाच्या माध्यमातून मानवाचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संगम – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्य शासकीय योग दिन

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत घोषणाआदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार· ५० लाख कुटुंबांना लाभ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अमरावती विभागातील १,१८७ रुग्णांना १०.६१ कोटींची मदत…

vishwatmaklokswamivarta